मुंबई - शेअर बाजार निर्देशांकाने ४१,९०३.३६ या अंशाचा विक्रम नोंदविला. तर निफ्टीच्या निर्देशांकाने १२३४५ हा जादूई आकडा (मॅजीकल फिगर) गाठला आहे.
निफ्टी ५० मध्ये आघाडीच्या ५० कंपन्या सूचीबद्ध करण्यात आल्या आहेत. या निफ्टीने १२,३४५ हा जादूई आकडा गाठला आहे. निफ्टी निर्देशांकाची १ एप्रिल १९९६ पासून सुरुवात झाली आहे. निफ्टीचा मुंबई शेअर बाजाराहून अधिक विस्तार झाला आहे. मुंबई शेअर बाजार हा आशियातील सर्वात जुना शेअर बाजार आहे.
हेही वाचा-ठेवीदार संकटात; बंगळुरुमधील 'या' सहकारी बँकेवर आरबीआयचे आर्थिक निर्बंध
मुंबई शेअर बाजार खुला होताना निर्देशांक ४१,८८३.०९ वर पोहोचला होता. तर 'इन्ट्रा डे'ला ४१,९०३.३६ या विक्रमी अंशावर पोहोचला होता. निफ्टीचा निर्देशांक ५.४० अंशाने वधारून १२,३३४.९५ पोहोचला होता.
या कंपन्यांचे घसरले-वधारले शेअर-
मुंबई शेअर बाजारात टाटा स्टील, टीसीएस, हिरो मोटोकॉर्प, एचसीएल टेक, आयटीसी आणि महिंद्रा अँड महिंद्राचे शेअर वधारले आहेत. तर एचडीएफसी बँक, रिलायन्स इंडस्ट्रीज, आयसीआयसीआय बँक आणि कोटक महिंद्रा बँकेचे शेअर घसरले आहेत.
हेही वाचा-घाऊक बाजारपेठेतही महागाईचा भडका; डिसेंबरमध्ये २.५९ टक्क्यांची नोंद