ETV Bharat / business

मोदी सरकारकडून पेट्रोलसह डिझेलच्या उत्पादन शुल्कात कपात; तरीही दर 100 रुपयांपुढेच राहणार - Modi government on excise duty

केंद्र सरकारने पेट्रोलवरील उत्पादन 5 रुपये तर तर डिझेलवरील उत्पादन शुल्क 10 रुपयांनी कमी केले आहे. देशातील बहुतांश शहरांमध्ये पेट्रोलची किंमत 100 रुपयांहून अधिक आहे. गेली काही दिवस पेट्रोल आणि डिझेलच्या किमती रोज प्रति लिटर 35 पैशांनी वाढल्या आहेत.

मोदी सरकार
मोदी सरकार
author img

By

Published : Nov 3, 2021, 9:03 PM IST

Updated : Nov 3, 2021, 10:09 PM IST

नवी दिल्ली - पेट्रोल आणि डिझेलच्या दरवाढीने त्रस्त झालेल्या नागरिकांकरिता आनंदाची बातमी आहे. केंद्र सरकारने पेट्रोल आणि डिझेलवरील उत्पादन शुल्कात कपात केली आहे. मात्र, सध्याचे इंधनाचे वाढलेले भरमसाठ पाहता उत्पादन शुल्कातील कपात फारशी नसल्याचे म्हटले जात आहे.

केंद्र सरकारने पेट्रोलवरील उत्पादन 5 रुपये तर तर डिझेलवरील उत्पादन शुल्क 10 रुपयांनी कमी केले आहे. देशातील बहुतांश शहरांमध्ये पेट्रोलची किंमत 100 रुपयांहून अधिक आहे. गेली काही दिवस पेट्रोल आणि डिझेलच्या किमती रोज प्रति लिटर 35 पैशांनी वाढल्या आहेत. त्यामुळे केंद्र सरकारवर जनतेसह विरोधी पक्षांकडून सातत्याने टीका करण्यात येत आहे.

हेही वाचा-विशेष : कर्नाटकातील दिवाळी कशी असते, सांगतायेत पूर्णब्रह्मच्या प्रमुख जयंती कठाळे

दरम्यान, उत्पादन शुल्कात कपात केल्याने मध्यरात्रीपासून पेट्रोल व डिझेलच्या दरात कपात होणार आहे.

11 महिन्यांमध्ये आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाचे दर सर्वाधिक

आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाचे दर प्रति बॅरल 85 डॉलर आहेत. हे दर गेल्या 11 महिन्यांत सर्वाधिक आहेत. भारताला पेट्रोल आणि डिझेलच्या गरजेसाठी आयातीच्या तेल इंधनावर अवलंबून राहावे लागते. त्यामुळे जागतिक बाजारात कच्च्या तेलाचे दर वाढल्याने देशातील सार्वजनिक तेल कंपन्यांकडून इंधनाचे दर वाढविण्यात येतात. दुसरीकडे केंद्र सरकारकडून इंधनावरील कराचे प्रमाण जास्त असल्याचा आरोप विरोधकांकडून करण्यात येतो.

हेही वाचा-DIWALI 2021: महाराष्ट्रातील देश-विदेशातील महागड्या मिठाई.. 'या' 10 मिठाईंची किंमत ऐकून बसेल धक्का

Last Updated : Nov 3, 2021, 10:09 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.