नवी दिल्ली – मारुती सुझुकीच्या वाहनांच्या विक्रीला कोरोना महामारीचा फटका बसला आहे. मागील वर्षाच्या जुलैच्या तुलनेत यंदा जुलैमध्ये 1.1 टक्क्यांनी वाहन विक्रीत घसरण झाली आहे.
गतवर्षी जुलैमध्ये मारुती सुझुकीच्या 1 लाख 9 हजार 264 वाहनांची विक्री झाली होती. यंदा जुलैमध्ये 1 लाख 8 हजार 64 वाहनांची विक्री झाली आहे.
देशाच्या बाजारपेठेत जुलैमध्ये मारुती सुझुकीच्या 1 लाख वाहनांची विक्री झाली आहे. तर 6 हजार 757 वाहनांची निर्यात झाली आहे. तर मागील वर्षात जुलैमध्ये 9 हजार 258 वाहनांची निर्यात झाली होती. जुलै 2020 मध्ये 1 लाख 8 हजार 64 वाहनांची विक्री झाली आहे. ही जून 2020 नंतर 82 टक्क्यांची वाहन विक्रीत वाढ झाली आहे. तर गतवर्षीच्या तुलनेत 1.1 टक्क्यांची वाहन विक्रीत घसरण झाली आहे.