ETV Bharat / business

मारुती सुझुकीने गाठला मैलाचा दगड; आजपर्यंत एकूण २० लाख कारची निर्यात - Maruti 20 lakh exports

मारुती सुझुकीने सर्वप्रथम सप्टेंबर १९८७ मध्ये ५०० कार हंगेरीमध्ये निर्यात केल्या होत्या. त्यानंतर कंपनीने आर्थिक वर्ष २०१२-१३ मध्ये १० लाख वाहनांच्या निर्यातीचा टप्पा गाठला आहे.

Maruti Suzuki
मारुती सुझुकी
author img

By

Published : Feb 27, 2021, 4:44 PM IST

नवी दिल्ली - मारुती सुझुकीने २० लाख वाहनांच्या निर्यातीचा आज महत्त्वपूर्ण टप्पा पूर्ण केला आहे. मारुती कंपनीकडून आर्थिक वर्ष १९८६-८७ पासून वाहनांची निर्यात करण्यात येत आहे.

मारुती सुझुकीने सर्वप्रथम सप्टेंबर १९८७ मध्ये ५०० कार हंगेरीमध्ये निर्यात केल्या होत्या. त्यानंतर कंपनीने आर्थिक वर्ष २०१२-१३ मध्ये १० लाख वाहनांच्या निर्यातीचा टप्पा गाठला आहे. पहिल्या दहा लाख वाहनांच्या टप्प्यात ५० टक्क्यांहून अधिक निर्यात ही युरोपमधील विकसित बाजारपेठांमध्ये करण्यात आली आहे. मारुतीने १० लाख वाहनांच्या निर्यातीचा टप्पा केवळ आठ वर्षात गाठला आहे. त्यासाठी कंपनीने वेगाने लॅटिन अमेरिका, आफ्रिका आणि आशियामधील वाढणाऱ्या बाजारपेठांवर विशेष लक्ष केंद्रित केले आहे.

हेही वाचा-प्लास्टिकचा कमी वापर असलेली खेळणी तयार करा- पंतप्रधानांचे उद्योगांना आवाहन

  • सतत प्रयत्नपूर्वक लक्ष केंद्रित करून कंपनीने चिली, इंडोनिशिया, दक्षिण आफ्रिका आणि श्रीलंकेच्या बाजारपेठेमध्ये लक्षणीय हिस्सा मिळवू शकली आहे. या बाजारपेठांमध्ये अल्टो, बॅलेनो, डिझायर आणि स्विफ्टला ग्राहकांकडून चांगली पसंती मिळाली आहे.
  • मारुती सुझुकीच्या १४ मॉडेलची १०० हून अधिक देशांमध्ये निर्यात करण्यात येते. मारुतीच्या १०० मॉडेलमध्ये १५० प्रकारची विविध वाहने आहेत. कंपनीने जानेवारीपासून जिम्मी कारचे उत्पादन व निर्यात करण्यात सुरुवात केली आहे.

हेही वाचा-ऐन लग्नसराईत जळगावात चांदी दीड हजारांनी तर सोने ५०० रुपयांनी स्वस्त

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.