मुंबई - शेअर बाजारासह निफ्टीने आजपर्यंतचा सर्वोच्च विक्रमी निर्देशांक नोंदविला आहे. मुंबई शेअर बाजाराने ४१,८९९.६३ निर्देशांक नोंदविला. तर निफ्टीने १२,३३७.७५ या विक्रमी निर्देशांकाची नोंद केली.
मुंबई शेअर बाजाराने ४१,८९९.६३ या सर्वोच्च निर्देशांकाची नोंद करून घसरण अनुभवली. शेअर बाजार बंद होताना निर्देशांक २५९.९७ अंशाने वधारून ४१.८५९.६९ अंशावर स्थिरावला. निफ्टीनेही आजपर्यंतच्या सर्वोच्च निर्देशांकांची नोंद केली. त्यानंतर निफ्टी बंद होताना निर्देशांक ७२.७५ अंशाने वधारून१२,३२९.५५ वर स्थिरावला. मुंबई शेअर बाजारात इन्फोसिसचे शेअर ४.७६ टक्क्यांनी वधारले. इन्फोसिसने डिसेंबरच्या तिमाहीत २३.७ टक्क्यांनी नफा नोंदविल्याने कंपनीचे शेअर वधारले आहेत.
हेही वाचा-वित्त क्षेत्राच्या भरभराटीसाठी पायाभूत सुविधांमध्ये सुधारणांची गरज
या कंपन्यांचे घसरले-वधारले शेअर
इंडुसइंड बँक, भारती एअरटेल, एचयूएल, एम अँड एम, टाटा स्टील, पॉवरग्रीड आणि टेक महिंद्राचे शेअर मुंबई शेअर बाजारात वधारले. टीसीएस, एसबीआय, बजाज ऑटो, आयसीआयसीआय बँक, रिलायन्स इंडस्ट्रीज, अॅक्सिस बँक आणि नेस्ले इंडियाचे शेअर घसरले आहेत.
हेही वाचा-तन टाटांविरोधातील अब्रुनुकसानीचा खटला नस्ली वाडिया यांनी घेतला मागे
सलग तीन महिन्यांच्या घसरणीनंतर औद्योगिक उत्पादन निर्देशांकात नोव्हेंबरमध्ये १.८ टक्क्यांची वृद्धी झाली आहे. त्याचाही शेअर बाजारावर सकारात्मक परिणाम झाला.
सोन्यासह चांदीच्या भावात घसरण
सोन्याचा भाव प्रति तोळा २३६ रुपयांनी घसरून ४०,४३२ रुपयांवर पोहोचला. चांदीचा भाव हा प्रति किलो ३७६ रुपयांनी घसरून ४७,६३५ रुपयांवर पोहोचला आहे.