ETV Bharat / business

सलग पाचव्या सत्रात मुंबई शेअर बाजारात घसरण - मुंबई शेअर मार्केट अपडेट न्यूज

मुंबई शेअर बाजार दिवसाखेर ५३५.५७ अंशाने घसरून ४६,८७४.३६ वर स्थिरावला. तर निफ्टीचा निर्देशांक १४९.९५ अंशाने घसरून १३,८१७.५५ वर स्थिरावला.

शेअर बाजार न्यूज
शेअर बाजार न्यूज
author img

By

Published : Jan 28, 2021, 4:31 PM IST

मुंबई - शेअर बाजाराचा निर्देशांक सलग पाचव्या सत्रात घसरला आहे. मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक दिवसाखेर ५३६ अंशाने घसरला आहे. एचडीएफसी बँक, इन्फोसिस आणि एचयूएलचे शेअर घसरले आहे. जागतिक बाजारात नकारात्मक स्थिती असल्याने शेअर बाजार निर्देशांकात घसरण झाली आहे.

मुंबई शेअर बाजार दिवसाखेर ५३५.५७ अंशाने घसरून ४६,८७४.३६ वर स्थिरावला. तर निफ्टीचा निर्देशांक १४९.९५ अंशाने घसरून १३,८१७.५५ वर स्थिरावला.

हेही वाचा-एअरटेल '५जी'करता तयार; हैदराबादमध्ये यशस्वी चाचणी

या कंपन्यांचे घसरले-वधारले शेअर

एचयूएलचे शेअर सुमारे ४ टक्क्यांनी घसरले. मारुती, एचडीएफसी बँक, पॉवरग्रीड, इंडसइंड बँक, एचसीएल टेक आणि बजाज फिनसर्व्हचे शेअर घसरले आहेत. तर दुसरीकडे अ‌ॅक्सिस बँक, स्टेट बँक ऑफ इंडिया, ओएनजीसी आणि आयसीआयसीआय बँकेचे शेअर वधारले आहेत.

हेही वाचा-अ‌ॅपलचा भारतामधील व्यवसाय तिसऱ्या तिमाहीत दुप्पट

अशी आहे बाजारातील स्थिती-

केंद्रीय अर्थसंकल्प सादर होण्यापूर्वी गुंतवणुकदारांनी नफा नोंदविण्याकडे कल दाखविल्याचे रिलायन्स सिक्युरिटीजचे मुख्य रणनीतीकार विनोद मोदी यांनी सांगितले. विश्लेषकांच्या माहितीनुसार विदेशी गुंतवणूकदार संस्थांनी देशातील बाजारपेठेतून निधी काढून घेण्याचे प्रमाण वाढले आहे. त्याचाही देशातील गुंतवणुकदारांवर परिणाम झाला आहे. विदेशी गुंतवणूकदार संस्थांनी (एफपीआय) भारतीय भांडवली बाजारातून १,६८८.२२ कोटी रुपयांचे शेअर बुधवारी विकले आहेत. दरम्यान, जागतिक कच्च्या तेलाच्या बाजारपेठेत कच्च्या तेलाच्या प्रति बॅरलचा दर ०.२७ टक्क्यांनी घसरून ५५.३९ डॉलर आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.