ETV Bharat / business

शेअर बाजार निर्देशांकात १२२ अंशाची घसरण; अमेरिकेतील राजकीय अस्थिरतेने गुंतवणूकदार चिंतेत

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्यावर महाभियोग प्रक्रिया सुरू झाली आहे.  अमेरिकेत होत असलेल्या राजकीय अस्थिरतेने जगभरातील गुंतवणूकदार चिंताग्रस्त झाले आहेत.

संग्रहित - शेअर बाजार
author img

By

Published : Sep 27, 2019, 1:37 PM IST

मुंबई - शेअर बाजार आणि निफ्टीच्या निर्देशांकात घसरण झाली आहे. जागतिक आर्थिक मंचावरील स्थिती आणि अमेरिकेतील राजकीय अस्थिरतेने गुंतवणूकदार चिंतित झाले आहेत. गुंतवणुकदारांच्या निरुत्साहाने शेअर बाजार निर्देशांक १२२ अंशाने घसरला आहे.

शेअर बाजार निर्देशांक सकाळी ११ वाजून ३५ मिनिटाला १२२.४६ अंशाने घसरून ३८,८६७.२८ वर पोहोचला. तर निफ्टीचा निर्देशांक ४४.६५ अंशाने घसरून ११,५२६.५५ वर पोहोचला.

या कंपन्यांचे शेअर घसरले-वधारले
येस बँक, टाटा मोटर्स, वेदांत, टाटा स्टील, एशियन पेंट्स, ओएनजीसी, आयसीआयसीआय बँक, कोटक बँक, इंडसइंड बँक आणि हिरो मोटोकॉर्पचे शेअर ३ टक्क्यापर्यंत घसरले आहेत.
आयटीसी, एनटीपीसी, इन्फोसिस, बजाज फायनान्स, एसबीआय, एचसीएल टेक, एचडीएफसी आणि मारुतीचे शेअर हे २ टक्क्यांनी वधारले आहेत.

हेही वाचा-'फरार आर्थिक गुन्हेगार' म्हणून जाहीर करण्याच्या ईडीच्या याचिकेला नीरव मोदीचा विरोध

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्यावर महाभियोग प्रक्रिया सुरू झाली आहे. अमेरिकेत होत असलेल्या राजकीय अस्थिरतेने जगभरातील गुंतवणूकदार चिंताग्रस्त झाले आहेत.

हेही वाचा-पेट्रोल-डिझेलच्या दरवाढीचा भडका सुरुच; मुंबईत पेट्रोल प्रति लिटर ८० रुपये!

शेअर बाजारात गुरुवारी ३९६.२२ अंशाची घसरण-

शेअर बाजार निर्देशांक गुरुवारी ३९६.२२ अंशाने घसरून ३८,९८९.७४ वर बंद झाला होता. तर निफ्टीचा निर्देशांक १३१ अंशाने घसरून बंद होताना ११,५७१.२० वर पोहोचला होता.
विदेशी गुंतवणूकदार संस्थांनी गुरुवारी ७३७.१७ कोटींच्या शेअरची खरेदी केली. तर देशातील गुंतवणूकदार संस्थांनी ३३९.२८ कोटींच्या शेअरची खरेदी केली.

हेही वाचा-कांद्याचे भाव नोव्हेंबरपासून उतरतील - नीती आयोग

Intro:Body:Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.