मुंबई - शेअर बाजार निर्देशांक सकाळच्या सत्रात १०६.३६ अंशाने वधारून ४०,२३४.८६ वर पोहोचला, तर निफ्टीचा निर्देशांक हा २४.६५ अंशाने वधारून ११,९०२ वर पोहोचला आहे.
सलग पाचव्या सत्रात शेअर बाजार निर्देशांक वधारला आहे. शेअर बाजार निर्देशांक ७७ अंशाने वधारून ४०,१२९ वर पोहोचला होता. आयटी आणि बँकिंगचे शेअर वधारल्याने गुरुवारी शेअर बाजार निर्देशांक वधारला होता.
येस बँकेचे शेअर गुरुवारी ३८ टक्क्यांनी वधारले होते. येस बँकेत विदेशी गुंतवणूकदार सुमारे ८ हजार ५०० कोटी रुपये गुंतवणार आहे.