नवी दिल्ली - एलजी इलेक्ट्रॉनिक्सने जी श्रेणीतील 'जी८एक्सथिनक्यू' हा स्मार्टफोन लाँच केला आहे. या स्मार्टफोनला दोन डिसप्ले आहेत. हा स्मार्टफोन भारतीय बाजारपेठेत ४९,९९९ रुपयांना उपलब्ध होणार आहे.
स्मार्टफोनमध्ये दोन डिसप्ले हे समांतरपणे देण्यात आली आहेत. त्यामुळे दोन अॅपवर काम करणे अशा विविध गोष्टी एकाचवेळी करणे शक्य होणार आहे. ही माहिती एलजी इलेक्ट्रॉनिक्स इंडियाच्या मोबाईल विभागाचे प्रमुख अद्वैत वैद्य यांनी दिली.
हेही वाचा-'नियमनातील अनिश्चितताही भारताच्या मंदीला कारण'
ही आहेत स्मार्टफोनमध्ये वैशिष्ट्ये-
- स्मार्टफोनमध्ये ६.४ इंचचा ओएलईडी हा डिसप्ले देण्यात आलेला आहे. त्यामध्ये फिंगरप्रिट सेन्सर दिल्याने स्मार्टफोन बंद करणे आणि चालू करणे सहज शक्य होणार आहे.
- स्मार्टफोनला १२ मेगापिक्सेल आणि १३ मेगापिक्सेलचा सुपर वाईड कॅमेरा आहे. तर पाठीमागील बाजूस ३२ मेगापिक्सेलचा कॅमेरा आहे.
- संगीत ऐकण्याची आवड ऐकणाऱ्यांसाठी १.२ वॅटचे स्पीकर्स आहेत. यामध्ये ३२ बिट हाय-फाय क्वाड डिएसीची सुविधा मेरिडियन ओडिओमधून देण्यात आलेली आहे. त्यामुळे स्पीकरमधून आवाज ऐकण्याचा वापरकर्त्यांना चांगला अनुभव घेणे शक्य होते.
- चलचित्रण करताना (व्हिडिओ) स्वयंचलितपणे ध्वनीमुद्रण(रेकॉर्डिंग) सुरू होणारी एएसएमआरची (ऑटोनोमस सेन्सरी मेरिडियन रिस्पॉन्स) सुविधा आहे.
- दोन डिसप्ले असल्याने त्याचा मिनी लॅपटॉप म्हणून उपयोग करता येतो. डिसप्लेला आभासी (व्हर्च्युअल) कीबोर्ड देण्यात आलेला आहे. त्यामुळे ईमेल, सादरीकरण (प्रेझेन्टेशन्स), मजकूर व इंटरनेट सर्च करणे सोपे होते.
- क्वालकोम्न स्नॅपड्रॅगन ८५५ ओक्टा कोअर प्रोसेसर आहे. तर ६ जी रॅम आहे. तर १२८ जीबीमध्ये वापरकर्त्याला माहिती साठवता येणार आहे. फोनला ४ हजार एमएएच बॅटरी आहे. तर ऑपरेटिंग सिस्टिम ही ९.० पाई देण्यात आलेली आहे.