मुंबई - लक्ष्मी विलास बँकेच्या शेअरमध्ये मुंबई शेअर बाजारात ५ टक्के घसरण झाली आहे. भारतीय रिझर्व्ह बँकेने लक्ष्मी विलास बँकेवर तत्पर सुधारात्मक आकृतिबंधाची कारवाई केल्यानंतर ही घसरण झाली आहे.
लक्ष्मी विलास बँकेच्या शेअरमध्ये ४.९२ टक्क्यांची घसरण होवून प्रति शेअरची किंमत ३४.७५ रुपये झाली आहे. गेल्या ५२ आठवड्यात बँकेच्या शेअरमध्ये झालेली ही सर्वात मोठी घसरण आहे.
हेही वाचा-भारतीय रिझर्व्ह बँकेची लक्ष्मी विलास बँकेवर तत्पर सुधारात्मक आकृतिबंधाची कारवाई, 'ही' आहेत कारणे
लक्ष्मी विलास बँकेला वित्तीय शिस्त लागण्यासाठी भारतीय रिझर्व्ह बँकेने तत्पर सुधारात्मक आकृतिबंधाची (पीसीए) कारवाई केली. वाढलेले बुडित कर्ज इत्यादी समस्यांना लक्ष्मी विलास बँक सामोरे जात आहे. ही कारवाई बँकेची कामगिरी सुधारणा करण्यासाठी करण्यात आली आहे. त्याचा रोजच्या व्यवहारावर तसेच मुदत ठेवी देव-घेवीवर कोणताही परिणाम होणार नसल्याचे लक्ष्मी विलास बँकेने यापूर्वीच म्हटले आहे.
हेही वाचा-रेल्वे स्टेशनमध्ये वाय-फाय सेवा देणाऱ्या रेलटेल कॉर्पोरेशनला ११० कोटींचा नफा
जाणून घ्या काय आहे तत्पर सुधारात्मक आकृतिबंध (पीसीए) ?
जेव्हा एखाद्या बँकेकडे जोखीम स्वीकारण्यासाठी पुरेशी रक्कम नसते, तेव्हा अशा भारतीय रिझर्व्ह बँक तत्पर सुधारात्मक आकृतिबंधाचे नियम लागू करते. त्या बँकेची वित्तीय स्थिती सुधारण्यासाठी हे आकृतीबंध लागू करण्यात येतात. त्या आकृतीबंधातील नियमांचे बँकेला कठोर पालन करावे लागते.
काय आहे एनपीए (बुडित कर्ज) म्हणजे?
बँकांकडून देण्यात येणारे जे कर्ज हे बुडित म्हणजे परत मिळण्याची शक्यता कमी असते, असे कर्ज एनपीए म्हणून ओळखले जाते.