हैदराबाद - चालू वर्ष हे शेअर बाजार गुंतवणुकदारांसाठी अत्यंत नफा मिळवून देणारे ठरले आहे. सप्टेंबरमध्ये 60 हजारापर्यंत शेअर बाजार निर्देशांक पोहोचला होता. कोरोनाच्या संकटातही शेअर बाजाराचा निर्देशांक निर्देशांकाचा नवनवीन उच्चांक करत आहे. दुसरीकडे आयपीओचेही प्रमाण वाढत आहे.
येत्या वर्षातही शेअर बाजारात (Share Market) आयपीओचे प्रमाणही वाढणार आहे. चालू वर्षात 21 जानेवारीला 50 हजारापर्यंत असलेला शेअर बाजार निर्देशांक (BSE) हा 8 महिन्यांमध्येच 60 हजारापर्यंत पोहोचला.
भारतीय शेअर बाजारातील तेजीने अनेक शेअर बाजार गुंतवणूकदार हे मालामाल झाले आहे. त्यामध्ये काही छोट्या शेअरनेही (Penny stock) चांगली कामगिरी केली आहे. असे शेअर आज ( profit from Multibagger Share ) झाले आहेत. अशा शेअरने वर्षभरातच गुंतवणुकदारांना काही पटीत लाभ मिळवून दिला आहे. अशा मल्टीबॅगर शेअरबाबत (Multibagger stocks 2021 ) तुम्हाला आम्ही काही माहिती देणार आहोत. या शेअरने ( Multibaggers of 2021) गुंतवणुकदारांना मालामाल केले. तुमच्याजवळ हे शेअर आहेत का?
हेही वाचा-TIPS FOR CAR INSURENCE POLICY : सर्वोत्तम कार विमा पॉलिसी कशी निवडावी
- फ्लोमिक ग्लोबल लॉजिस्टिक्स ( Flomic Global Logistics share profit )- या शेअरने गुंतवणूकदारांना काही पटीत फायदा करून दिला आहे. जर या कंपनीमध्ये तुम्ही वर्षभरापूर्वी 1 लाख रुपयांची गुंतवणूक केली असेल तर आज तुम्ही कोट्याधीश झालेले असता. 18 डिसेंबर 2020 ला या कंपनीच्या शेअरची किंमत 1.74 रुपये होती. 17 डिसेंबरला या शेअरची किंमत 187 रुपयावर पोहोचली आहे. याचा अर्थ वर्षभरात शेअरची किंमत 10 हजार टक्क्यांहून अधिक वाढली आहे.
- सिम्प्लेक्स पेपर्स ( Simplex Papers )- 21 डिसेंबर 2020 या कंपनीच्या शेअरची किंमत फक्त 84 पैसे होती. वर्षभरात कंपनीच्या शेअरची किंमत 10 हजार टक्क्यांनी वाढली आहे. 17 डिसेंबला या कंपनीच्या शेअरची किंमत 84.55 रुपये होती. 1 ऑक्टोबरला या कंपनीच्या शेअरची किंमत 7.43 रुपये होती. केवळ तीन महिन्यांत कंपनीच्या शेअरची किंमत 12 टक्क्यांनी वाढली आहे.
- सूरज इंडस्ट्रीज ( Suraj Industries shares)- या कंपनीच्या शेअरने गुंतवणुंकदारांना 7 हजार टक्क्यांनी परतावा दिला आहे. सूरज इंडस्ट्रीजच्या शेअरने गुंतवणूकदारांना 7 हजार टक्के परतावा दिला आहे. सूरज इंडस्ट्रीजच्या शेअरची किंमत 19 ऑगस्टला बीएसईमध्ये (BSE) 1.18 रुपये होती. तर तीन महिन्यानंतर 3 डिसेंबला शेअरची किंमत 78.15 रुपये होती. तर 17 डिसेंबरला शेअरची किंमत 127 रुपयावर पोहोचली. वर्षभरात शेअरची किंमत 1.78 रुपयांवरून 127 रुपयावर पोहोचली आहे. गेल्या 6 महिन्यापूर्वी म्हणजे जून महिन्यात शेअरची किंमत 2.24 रुपये होती. 1 नोव्हेंबरला शेअरची किंमत 27 रुपयांवर पोहोचली होती. 17 डिसेंबरपर्यंत गुंतवणुकदारांना 100 रुपयापर्यंत नफा मिळाला होता. त्यामुळे शेअर बाजार गुंतवणुकदारांना किती फायदा झाला, याचा विचार तुम्ही करू शकता.
- टाटा टेलीसर्व्हिसेस (महाराष्ट्र) लिमिटेड ( Tata Teleservices (Maharashtra) Limited )- 1 जानेवारी 2021 रोजी या शेअरची किंमत 7.48 रुपये होती. 17 डिसेंबला किंमत वाढून 189 रुपये झाली आहे. 1 नोव्हेंबरला या शेअरची किंमत 55.20 रुपये होती. तर पुढील दीड महिन्यात शेअरची किंमत 4 पटीने वाढली आहे. याचाच अर्थ एक महिन्यात गुंतवणुकदारांनी 4 पटीने नफा मिळविला आहे. ज्या गुंतवणुकदाराने वर्षभरापूर्वी टाटा टेलीसर्व्हिसेसमध्ये गुंतवणूक करणाऱ्या गुंतवणूकदारांना सुमारे 2500 टक्क्यांचा नफा मिळाला आहे.
- अरिहंत सुपरस्ट्रक्चर्स ( Arihant Superstructures )- ऑक्टोबर 2020 मध्ये शेअरची किंमत फक्त 20 रुपये होती. या कंपनीच्या शेअरची किंमत 17 डिसेंबरला 176 वर पोहोचली. या दरम्यान शेअर बाजार गुंतवणुकदारांना 800 टक्क्यांहून अधिक परतावा मिळाला आहे. जर एखाद्या गुंतवणुकदाराने वर्षभरापूर्वी 1 लाखांची गुंतवणूक केली असेल तर त्याच्या शेअरची किंमत 8 लाख रुपये झालेली आहे.
- कॉस्मो फेराइट्स ( Cosmo Ferrites )- गेल्या सहा महिन्यांत प्रति शेअरने गुंतवणुकदारांना 220 रुपयांचा नफा मिळवून दिला आहे. वर्षभरापूर्वी 18 डिसेंरला या कंपनीच्या शेअरची किंमत फक्त 13 रुपये होती. 17 डिसेंबरला या कंपनीच्या शेअरची किंमत 247.50 रुपयावर पोहोचली. अशा रीतीने गुंतवणुकदारांना सुमारे १८०० टक्के नफा मिळाला आहे. याचा अर्थ वर्षाच्या सुरुवातीला १ लाख रुपयाची गुंतवणूक केल्यास त्याचे मूल्य १८ ते २० पटीने वाढलेले असणार आहे.
- जिंदल पॉली इन्व्हेस्टमेंड अँड फायनान्स ( Jindal Poly Investment & Finance )- या शेअरची किंमत २०२१ मध्ये १५०० टक्क्यांनी वाढली आहे. गतवर्षी १८०० टक्क्यांनी किंमत वाढली होती. गतवर्षी डिसेंबरमध्ये या शेअरची किंमत १८.९० रुपये किंमत होती. या शेअरची किंमत ३५८ रुपयावर पोहोचली आहे. याचाच अर्थ गतवर्षी १ लाख रुपयांची गुंतवणूक केल्यास त्या शेअरचे मूल्य हे १८ लाख रुपयांचे झालेले दिसेल.
- अजंता सोया लिमिटेड ( Ajanta Soya Ltd )- या शेअरची किंमत ६०.२५ रुपये होती. १७ डिसेंबरला शेअरची किंमत २०० रुपयांवर पोहोचली. यादरम्यान शेअरची किंमत तीनपटीने वाढली आहे. गतवर्षी शेअरने गुंतवणुकदारांना २३० टक्के नफा मिळवून दिला. त्यामुळे हा शेअर गुंतवणुकदारांना मालामाल करणारा ठरला आहे.
हेही वाचा-Income Tax : केंद्र सरकारकडून आयकर भरण्यासाठी 31 डिसेंबरपर्यंतची मुदतवाढ
याचबरोबर अन्य कंपन्यांनी गुंतवणुकदारांना नफा मिळवून दिला आहे. गतवर्षी काही कंपन्यांच्या शेअरने गुंतवणुकदारांना काही पटीत नफा मिळवून दिला आहे.
- अदानी टोटल गॅस लिमिटेड ( Adani Total Gas Ltd.)- एक वर्षभरापूर्वी या शेअरची किंमत ३६३ रुपये होती. या शेअरची किंमत १८०० रुपयावर पोहोचली आहे. एका वर्षात या कंपनीच्या शेअरने गुंतवणुकदारांना ४०० टक्के नफा मिळवून दिला आहे. त्याचा अर्थ वर्षभरापूर्वीच्या गुंतवणुकीच्या चारपटीने गुंतवणुकदारांना नफा मिळवून दिला आहे.
- अदानी ट्रांसमिशन लिमिटेड ( Adani Transmission Ltd )- या कंपनीच्या शेअरची वर्षभरापूर्वी 424.85 किंमत होती. या कंपनीच्या शेअरने ३०० टक्के नफा मिळवून दिला. या शेअरची किंमत १७७५ रुपयावर पोहोचली आहे. वर्षभरापूर्वी केलेल्या गुंतवणुकीच्या चारपट गुंतवणुकदारांना नफा मिळाला आहे.
- टाटा मोटर्स (Tata Motors)- कंपनीच्या शेअरमध्ये वर्षभरात १६० टक्क्यांनी वाढ झाली आहे. गतवर्षी १८ डिसेंबरला या कंपनीच्या शेअरची किंमत १८०.५५ रुपये होती. चालू वर्षात १७ डिसेंबरला कंपनीच्या शेअरची किंमत ४७०.२० रुपये झाली होती. त्यामुळे गुंतवणुकदारांना अडीच पटीने नफा झाला आहे.
- ईक्लर्क्स सर्विसेज ( eClerx Services )- या कंपनीच्या शेअरची किंमत १८५ टक्क्यांनी वाढ झाली आहे. गतवर्षी कंपनीच्या शेअरची किंमत ७९८.४० रुपये होते. वर्षाच्या सुरुवातीला शेअरची किंमत १०० रुपयांनी वाढली होती. १७ डिसेंबरला शेअरची किंमत २,२७५ रुपयापर्यंत पोहोचली. शेअर बाजार गुंतवणुकादारांना गुंतवणुकीच्या ३ पट पैसे मिळाले आहेत.
हेही वाचा-'या' राज्यांनी करातून मिळवले सर्वाधिक उत्पन्न; महाराष्ट्र देशात अव्वल
याशिवाय अनेक मल्टीबॅगर शेअरने गुंतवणुकदारांना मालामाल केले आहे. एका वर्षामध्ये सर्वाधिक परतावा देणाऱ्या कंपनीमध्ये बालाजी अमाइन्स (Balaji Amines), हॅप्पीस्ट माइंड्स (Happiest Minds), दीपक फर्टिलाइजर्स ( Deepak Fertilisers ), सीडीएसएल (CDSL), मास्टेक (Mastek), रुट मोबाइल (Route Mobile), रियल एस्टेट कंपनी अनंत राज (Anant Raj) यांचा समावेश आहे.