ETV Bharat / business

अक्षय्य तृतीयेनिमित्त ज्वेलर्सकडून ऑनलाईन विक्रीचा प्रयत्न; टाळेबंदीनंतर मिळणार दागिने

इंडिया बुलियन अँड ज्वेलर्स असोसिएशनचे (आयबीजेए) राष्ट्रीय सचिव सुरेंद्र मेहता म्हणाले, की सोन्याच्या किमती आजपर्यंत सर्वाधिक आहेत. ही सराफा बाजारपेठेसाठी चांगली बातमी आहे.

सोने विक्री
सोने विक्री
author img

By

Published : Apr 26, 2020, 1:04 PM IST

नवी दिल्ली - अक्षयतृतीयेला मोठी उलाढाल होणारी सराफ बाजारपेठ टाळेबंदीमुळे ठप्प आहे. यातून मार्ग काढत अनेक सराफांनी ग्राहकांना ऑनलाईन खरेदीचा पर्याय उपलब्ध करून दिला आहे.

केंद्रीय गृहमंत्रालयाने दुकाने सुरू करण्यास परवानगी दिली असली तरी राज्यांनी सावधगिरीची भूमिका घेत दुकाने सुरू करण्याची परवानगी दिली नाही. व्यापारी संघटनेनेही दुकाने सुरू करू नका, असे दुकानदारांना आवाहन केले आहे. त्यामुळे देशातील सर्व सोन्याची दुकाने बंद आहेत. इंडिया बुलियन अँड ज्वेलर्स असोसिएशनचे (आयबीजेए) राष्ट्रीय सचिव सुरेंद्र मेहता म्हणाले, की सोन्याच्या किमती आजपर्यंत सर्वाधिक आहेत. ही सराफा बाजारपेठेसाठी चांगली बातमी आहे.

हेही वाचा-सुंदर पिचाई यांना वेतनांसह मिळणारे भत्ते जगात सर्वाधिक; आकडा ऐकून व्हाल थक्क

सराफांनी ग्राहकांशी संपर्क करून डिजीटल पद्धतीने व्यवहार करावेत, अशी सूचना दिल्याचे मेहता यांनी सांगितले. ग्राहकांना केवळ ऑनलाईन खरेदी करता येणार आहे. तर दागिने हे टाळेबंदीनंतर देण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले.

हेही वाचा-गरिबांना मे महिन्याच्या पहिल्या आठवड्यापासून डाळींचे होणार वाटप

अक्षय्य तृतीयेपासून लग्नसराईचा हंगाम सुरू होत आहे. मात्र, टाळेबंदी असल्याने नागरिकांनी सर्व कार्यक्रम पुढे ढकलेले आहेत. त्यामुळे ऑनलाईन खरेदीलाही कमी प्रतिसाद मिळण्याची शक्यता असल्याचे जीजेटीसीआयचे अध्यक्ष शांतीभाई पटेल यांनी सांगितले. ग्राहकांना स्वत:च्या पसंतीने खरेदी करण्याची इच्छा असते. त्यामुळे ऑनलाईन खरेदीला प्रतिसाद कमी मिळेल, अशी शक्यताही त्यांनी व्यक्त केली.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.