ETV Bharat / business

आयआरसीटीसीचा शेअर बाजारात दमदार प्रवेश; पहिल्याच दिवशी शेअरची किंमत दुप्पट

author img

By

Published : Oct 14, 2019, 2:06 PM IST

आयआरसीटीच्या शेअरला गुंतवणूकदारांनी चांगला प्रतिसाद दिल्याने निफ्टीत प्रति शेअरची किंमत ७१३.४५ रुपये झाली आहे. आयआरसीटीसी ही रेल्वेत खानपानाची सुविधा देणारी, ऑनलाईन रेल्वे तिकिटे आणि रेल्वे स्टेशनवर सीलबंद पाणी बॉटल पुरविणारी एकमेव मान्यता असलेली कंपनी आहे.

आयआरसीटीसीचा शेअर बाजारात दमदार प्रवेश

मुंबई - ऑनलाईन रेल्वे तिकिटे, पर्यटन आणि खानपानाची सुविधा देणारी आयआरसीटीसीचा मुंबई शेअर बाजारातील प्रवेश प्रचंड यशस्वी ठरला आहे. मुंबई शेअर बाजारात सूचिबद्ध होताना आयआरसीटीसीचे शेअरची किंमत १०१ पटीने वाढली आहे. आयआरसीटीच्या प्रति शेअरची किंमत ३२० रुपयावरून ६४४ रुपये झाली आहे.

आयआरसीटीच्या शेअरला गुंतवणूकदारांनी चांगला प्रतिसाद दिल्याने निफ्टीत प्रति शेअरची किंमत ७१३.४५ रुपये झाली आहे. आयआरसीटीसी ही रेल्वेत खानपानाची सुविधा देणारी, ऑनलाईन रेल्वे तिकिटे आणि रेल्वे स्टेशनवर सीलबंद पाणी बॉटल पुरविणारी एकमेव मान्यता असलेली कंपनी आहे.

आयआरसीटीसीच्या आयपीओलाही मिळाला प्रचंड प्रतिसाद-
आयआरसीटीसीने आयपीओ आणून ६४५ कोटींचे भांडवल उभा केले आहे. सर्व श्रेणीतील गुंतवणूकदारांकडून कंपनीच्या आयपीओला प्रतिसाद मिळाला आहे. आयआरसीटीच्या आयपीओत अपेक्षित उद्दिष्टाहून ११२ पट गुंतवणूक झाली आहे. तर किरकोळ वर्गवारीतही १५ पट अधिक गुंतवणूक झाली आहे. बिगर वित्तीय संस्थांनी ३५५ पटीने अधिक तर गुंतवणूकदार संस्थांनी १०९ पटीने अधिक गुंतवणूक केली आहे.

आयआरसीटीसी या १०० टक्के सरकारी मालकीच्या कंपनीतील सरकारचा हिस्सा १२.४ टक्क्य़ांनी कमी होऊन ८७.५ टक्क्य़ांवर येणार आहे. हा सरकारी हिस्सा कमी करण्यासाठी कंपनीचे २.०१६ कोटी समभाग विक्रीसाठी खुले करण्यात आले आहेत. या भागविक्रीतून ६४५ कोटी रुपये उभारले जाणे अपेक्षित होते. प्रत्यक्षात गुंतवणूकदारांकडून ७२ हजारांहून कोटींहून अधिक मूल्याची बोली लावण्यात आली.

आयआरसीटीसीचे समभाग प्रत्येकी ३१५ ते ३२० रुपये या किमतीदरम्यान विकले गेले आहेत. भागविक्रीत सहभागी होणाऱ्या छोटय़ा वैयक्तिक गुंतवणूकदारांना खरेदी मूल्यावर प्रति समभाग १० रुपयांची सवलत देण्यात येत आहे. आशिया खंडातील आर्थिक व्यवहार होणाऱ्या आघाडीच्या वेबसाईटपैकी आयआरसीटीसीची वेबसाईट आहे. दररोज १ कोटी ४० लाख रेल्वेतून प्रवास करतात. त्यापैकी ७१.४२ टक्के लोक आयआरसीटीच्या वेबसाईटवरून ऑनलाईन बुकिंग करतात.

काय आहे आयपीओ-

इनिशियल पब्लिक ऑफर (आयपीओ) म्हणजे कंपनीने शेअर बाजारात सूचिबद्ध होण्यापूर्वी आणलेल्या शेअरचे प्रारंभिक मूल्य असते. त्यासाठी कंपनीला सेबीकडून परवानगी घ्यावी लागते. तसेच कंपनीकडून लोकांसाठी माहिती जाहीर केली जाते.

Intro:Body:

Dummy-Business News

Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.