ETV Bharat / business

शेअर बाजारातील गुंतवणुकदारांनी चार दिवसात गमाविले ८ लाख कोटी! - शेअर बाजार अपडेट न्यूज

मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक आज ९३७.६६ अंशाने घसरून ४७,४०९.९३ वर स्थिरावला. गेल्या चार सत्रात शेअर बाजाराचा निर्देशांक एकूण २,३८२.१९ अंशाने घसरला आहे.

शेअर बाजार गुंतवणूकदार
शेअर बाजार गुंतवणूकदार
author img

By

Published : Jan 27, 2021, 7:45 PM IST

नवी दिल्ली- काही दिवस उच्चांकी निर्देशांक नोंदविल्यानंतर शेअर बाजारात घसरण सुरू आहे. गेल्या चार दिवसात शेअर बाजारात घसरण झाल्याने गुंतवणुकदारांनी ८ लाख कोटी रुपये गमाविले आहेत.

मुंबई शेअर बाजारात सलग चौथ्या सत्रात आज घसरण झाली आहे. मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक आज ९३७.६६ अंशाने घसरून ४७,४०९.९३ वर स्थिरावला. गेल्या चार सत्रात शेअर बाजाराचा निर्देशांक एकूण २,३८२.१९ अंशाने घसरला आहे. शेअर बाजारात सूचीबद्ध असलेल्या कंपन्यांचे भांडवली मूल्य हे ८,०७,०२५.०९ कोटी रुपयांवरून १,८९,६३,५४७.४८ कोटी रुपये झाले आहे.

हेही वाचा-'जीएसटी'तील किचकट तरतुदींविरोधात कर सल्लागारांचा शुक्रवारी देशव्यापी एल्गार

कोटक सिक्युरिटीजचे कार्यकारी उपाध्यक्ष रस्मीक ओझा म्हणाले की, सौद्यांची मुदत दोन दिवसाने संपत असताना शेअर बाजारात अस्थिरता दिसून आली आहे. अर्थसंकल्प सादर होण्यापूर्वी गुंतवणुकदारांनी सावधगिरी घेतली आहे. बहुतेक कंपन्यांची तिमाहीत कामगिरी घसरल्याचेही ओझा यांनी म्हटले आहे. अ‌ॅक्सिस बँक, टायटन, इंडसइंड बँक, एचडीएफसी बँक, डॉ. रेड्डीज, एचडीएफसी आणि एशियन पेंट्सचे शेअर ४ टक्क्यांहून अधिक घसरले आहेत.

हेही वाचा-केंद्रीय अर्थमंत्रालयाकडून ग्रामीण स्थानिक संस्थांना १२,३५१ कोटी रुपये मंजूर

या कंपन्यांचे घसरले-वधारले शेअर

अ‌ॅक्सिस बँक, टायटन, इंडसइंड बँक, एचडीएफसी बँक, डॉ. रेड्डीज, एचडीएफसी आणि एशियन पेंट्सचे शेअर घसरले आहे. केंद्रीय अर्थसंकल्प १ फेब्रुवारीला सादर होण्यापूर्वी गुंतवणुकदारांचा नफा नोंदविण्याकडे कल राहिल्याचे बाजार विश्लेषकांनी म्हटले आहे.

विदेशी गुंतवणूकदार संस्थांनी (एफपीओ) भारतीय भांडवली बाजारात सोमवारी ७६५.३० कोटी रुपयांचे शेअर विकल्याची माहिती शेअर बाजाराच्या आकडेवारीतून दिसून आली आहे. जागतिक बाजारात कच्च्या तेलाचे दर ०.४१ टक्क्यांनी वाढून प्रति बॅरल ५५.८७ डॉलर आहे

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.