ETV Bharat / business

कोरोनाचा फटका : गुंतवणूकदारांच्या संपत्तीत दोन दिवसातच ९.७४ लाख कोटींची घट - ICICI Bank

गभरातील शेअर बाजारांमध्ये अस्थिरता दिसून येत आहे. आर्थिक प्रोत्साहनात्मक देण्यात येणाऱ्या सुधारणा अपयशी ठरल्याने गुंतवणूकदारांची चिंता वाढली आहे. कोरोनाचा प्रसार वाढत असल्याने जागतिक मंदी येईल, अशीही गुंतवणूकदारांना भीती आहे.

corona Effect
कोरोनाचा फटका
author img

By

Published : Mar 17, 2020, 8:07 PM IST

नवी दिल्ली - कोरोना रुग्णांची संख्या वाढत असल्याने देशात चिंतेचे वातावरण आहे. दुसरीकडे शेअर बाजार गुंतवणूकदारांनाही मोठा आर्थिक फटका बसला आहे. गुंतवणूकदारांनी गेल्या दोनच दिवसात ९.७४ लाख कोटी रुपये गमाविले आहेत.

मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक सकाळच्या सत्रात वधारला होता. मात्र, शेअर बाजार बंद होताना ८१०.९८ अंशांनी पडझड होवून निर्देशांक ३०,५७९.०९ वर स्थिरावला. तर सोमवारी शेअर बाजार निर्देशांक २,७१३.४१ अंशांनी घसरला होता.

जागतिक आर्थिक मंचावरील नकारात्मक स्थितीने मुंबई शेअर बाजारात घसरण सुरू आहे. जगभरातील शेअर बाजारांमध्ये अस्थिरता दिसून येत आहे. आर्थिक प्रोत्साहनात्मक देण्यात येणाऱ्या सुधारणा अपयशी ठरल्याने गुंतवणूकदारांची चिंता वाढली आहे. कोरोनाचा प्रसार वाढत असल्याने जागतिक मंदी येईल, अशीही गुंतवणूकदारांना भीती आहे.

हेही वाचा-कोरोना : निर्यात ठप्प झाल्याने दररोज १५ हजार क्विंटल केळी पडून

देशातील शेअर बाजार हे जागतिक आर्थिक मंचावरील स्थितीचे अनुकरण करत असल्याचे रिलिगेअर ब्रोकिंगचे संशोधक अजित मिश्रा यांनी सांगितले. ३०-शेअरपैकी २१ कंपन्यांच्या शेअरमध्ये मोठी घसरण झाली आहे. यामध्ये आयसीआयसीआय बँक, इंडसइंड बँक, बजाज फायनान्स, एचडीएफसी आणि इन्फोसिसचे शेअर ८.९५ टक्क्यापर्यंत घसरले आहेत.

हेही वाचा-अमेरिकेत ऑनलाईन खरेदीचे वाढले प्रमाण; अॅमेझॉन १ लाख कर्मचाऱ्यांना देणार नोकरी

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.