ETV Bharat / business

चारच दिवसात शेअर बाजार गुंतवणुकदारांनी गमाविले ५.५ लाख कोटी! - रिलायन्स इंडस्ट्रीज शेअर किंमत न्यूज

गेल्या चार दिवसात शेअर बाजाराचा निर्देशांक १,४७७.८९ अंशाने घसरला आहे. तर शेअर बाजारात सूचीबद्ध असलेल्या कंपन्यांचे भांडवली मूल्य हे ५,५५,४००.५२ कोटी रुपयांवरून २,०३,७१,२५२.९४ कोटी रुपये झाले आहे.

Investor wealth
शेअर बाजार गुंतवणूकदार
author img

By

Published : Mar 17, 2021, 8:13 PM IST

नवी दिल्ली - शेअर बाजार निर्देशांकात घसरण झाल्याने गुंतवणुकदारांनी ५.५५ लाख कोटी रुपये चार दिवसात गमाविले आहेत. कोरोनाबाधितांचे प्रमाण देशात वाढत असल्याने शेअर बाजाराला मोठा फटका बसला आहे.

रिलायन्स इंडस्ट्रीजच्या शेअरच्या दरात आज मोठ्या प्रमाणात झाली आहे. तर बँकिंगचे शेअर घसरले आहे. त्यानंतर मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक दिवसाखेर ५६२.३४ अंशाने घसरून निर्देशांक ४९,८०१.६२ वर स्थिरावला. गेल्या चार दिवसात शेअर बाजाराचा निर्देशांक १,४७७.८९ अंशाने घसरला आहे. तर शेअर बाजारात सूचीबद्ध असलेल्या कंपन्यांचे भांडवली मूल्य हे ५,५५,४००.५२ कोटी रुपयांवरून २,०३,७१,२५२.९४ कोटी रुपये झाले आहे.

हेही वाचा-नोकिया १० हजार कर्मचाऱ्यांना नोकरीतून काढणार; 5 जी तंत्रज्ञानावर करणार लक्ष्य

रिलीगेअर ब्रोकिंगचे उपाध्यक्ष अजित मिश्रा म्हणाले की, देशात कोरोनाबाधितांचे प्रमाण वाढत आहे. तसेच अमेरिकेच्या फेडरल रिझर्व्हची बैठक होत असताना गुंतवणुकदारांची चिंता वाढली आहे.

हेही वाचा-आरबीआयने स्टेट बँकेला ठोठावला २ कोटींचा दंड

या कंपन्यांचे घसरले शेअर-

शेअर बाजारातील सर्व क्षेत्रनिहाय निर्देशांकात घसरण झाली आहे. तेल, नैसर्गिक वायू, वीज, स्थावर मालमत्ता क्षेत्र, उर्जा आणि युटिलिटी यांच्या शेअरमध्ये ३.२२ टक्क्यापर्यंत घसरण झाली आहे. ओएनजीसीचे शेअर ४.९५ टक्क्यापर्यंत घसरले आहेत. तर त्यापाठोपाठ एनटीपीसी, सन फार्मा, स्टेट बँक ऑफ इंडिया, इंडसइंड बँक, रिलायन्स इंडस्ट्रीज आणि बजाज ऑटोचे शेअर घसरले आहेत. रिलायन्स इंडस्ट्रीजचे शेअर २.१६ टक्क्यांनी घसरले आहेत.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.