नवी दिल्ली - जागतिक बाजारातील सकारात्मक स्थितीने शेअर बाजाराचा निर्देशांक सलग दुसऱ्या सत्रात आज वधारला आहे. त्यामुळे शेअर बाजार गुंतवणुकदारांच्या संपत्तीत दोन दिवसांमध्ये ६,०२,००१.९ कोटी रुपयांची वाढ झाली आहे.
मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक दिवसाखेर १,१२८.०८ अंशाने वधारून ५०,१३६.५८ वर स्थिरावला. शुक्रवारी मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक ५६८.३८ अंशाने वधारला होता. शेअर बाजारातील सूचीबद्ध कंपन्यांचे भांडवली मूल्य आज ६,०२,००१.९ कोटी रुपयांवरून २,०४,७७,४७२.३३ कोटी रुपये झाले आहे.
जिओजीट फायनान्शियल सर्व्हिसेसचे प्रमुख विनोद नायर म्हणाले की, कोरोनाबाधितांचे प्रमाण वाढत असताना त्याबाबतच्या चिंतेकडे गुंतवणुकदारांनी लक्ष दिले नाही. लसीकरणाने अर्थव्यवस्था सावरत असताना त्याकडे गुंतवणुकदारांनी लक्ष केंद्रित केले आहे.
हेही वाचा-टाटा ग्रुपबरोबर कायदेशीर लढाई हरल्यानंतर सायरस मिस्त्री यांनी 'ही' दिली प्रतिक्रिया
या कंपन्यांचे वधारले-घसरले शेअर
एचडीएफसी बँकेचे सर्वाधिक ४.११ टक्क्यांहून अधिक शेअर वधारले आहेत. एचसीएल टेकचे शेअर ३.९१ टक्के, इन्फोसिसचे शेअर ३.६९ टक्के, हिंदुस्थान युनिलिव्हरचे शेअर ३.५९ टक्के तर एनटीपीसीचे शेअर ३.४ टक्क्यांनी वधारले आहेत. एम अँड एम, अॅक्सिस बँक आणि भारती एअरटेलचे शेअर घसरले आहेत. शेअर बाजारातील सर्व क्षेत्रनिहाय निर्देशांक वधारले आहेत. तर आयटी, टेक, धातू, हेल्थकेअर, एफएमसीजी, बेसिक मटेरियल्स आणि वित्त या क्षेत्रातील कंपन्यांचे शेअर ३.५१ टक्क्यापर्यंत वधारले आहेत.
हेही वाचा-ऑडिटमधील हेराफेरीला बसणार आळा; १ एप्रिलपासून 'हा' बदल होणार लागू