ETV Bharat / business

शेअर बाजार गुंतवणुकदारांच्या संपत्तीत ३ दिवसांत १२.३१ लाख कोटींची भर

author img

By

Published : Feb 3, 2021, 8:18 PM IST

मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक दिवसाखेर ४५८.०३ अंशाने वधारून ५०,२५५.७५ वर स्थिरावला. तर निफ्टीचा निर्देशांक ७२८.६७ अंशाने वधारून ५०,५२६.३९ वर स्थिरावला.

शेअर बाजार गुंतवणूकदार संपत्ती
शेअर बाजार गुंतवणूकदार संपत्ती

नवी दिल्ली - शेअर बाजार गुंतवणुकदारांची संपत्ती ही तीन दिवसांत १२.३१ लाख कोटी रुपयांनी वाढली आहे. शेअर बाजारातील सूचीबद्ध कंपन्यांचे भांडवली मूल्य हे वाढून १९८.४३ लाख कोटींवर पोहोचले आहे. मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक पहिल्यांदाच दिवसाखेर ५०,०० हून अधिक अंशावर पोहोचला.

मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक दिवसाखेर ४५८.०३ अंशाने वधारून ५०,२५५.७५ वर स्थिरावला. तर निफ्टीचा निर्देशांक ७२८.६७ अंशाने वधारून ५०,५२६.३९ वर स्थिरावला. गेल्या तीन दिवसांत मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक ३,९६९.९८ अंशाने वधारला आहे. रिलायन्स सिक्युरिटीजचे मुख्य रणनीतीकार विनोद मोदी म्हणाले की, केंद्रीय अर्थसंकल्पाबाबत शेअर बाजार गुंतवणुकदारांनी सकारात्मक प्रतिसाद दिला आहे. येत्या काळात आरबीआयच्या पतधोरण धोरणावर गुंतवणुकदारांचे लक्ष असणार आहे.

हेही वाचा-'बंदी लागू केलेल्या चिनी अ‌ॅपकडून भारतीयांचा डाटा मिळवा'

या कंपन्यांचे वधारले-घसरले निर्देशांक

इंडसइंड बँकेचे सर्वाधिक ७.६५ टक्क्यांहून अधिक शेअर वधारले आहेत. तर पॉवरग्रीड, डॉ. रेड्डीज, सन फार्मा, एनटीपीसी आणि अॅक्सिस बँकेचे शेअर वधारले आहेत. तर अल्ट्राटेक सिमेंट, मारुती, आयटीसी, कोटक बँक आणि एशियन पेंट्सचे शेअर घसरले आहेत.

हेही वाचा-आरबीआयच्या पतधोरण समितीची तीन दिवसीय बैठक आजपासून सुरू

दरम्यान, नव्या वर्षात शेअर बाजार गुंतवणुकदारांची संपत्ती ही ३२.४९ लाख कोटी रुपयांनी वाढली होती.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.