ETV Bharat / business

ह्युंदाईने लाँच केली ऑरा; जाणून घ्या किंमत - sedan four Wheeler

ह्युदांईच्या नव्या मॉडेलने चारचाकींच्या विक्रीत सुधारणा होणार असल्याचे ह्युंदाई मोटर इंडियाचे व्यवस्थापकीय संचालक एस. एस. किम यांनी सांगितले.

Hyundai Aura
ह्युंदाई ऑरा
author img

By

Published : Jan 21, 2020, 6:43 PM IST

नवी दिल्ली - ह्युदांई मोटर इंडियाने सेडान श्रेणीतील ऑरा ही नवी चारचाकी लाँच केली आहे. या चारचाकीची किंमत ५.७९ लाख रुपये ते ९.२२ लाख रुपये (एक्स शोरुम दिल्ली) दरम्यान आहे.

ऑरा चारचाकीचे इंजिन हे बीएस-६ क्षमतेचे (१.२ लिटर डिझेल) आहे. पेट्रोलवर चालणाऱ्या ऑराची किंमत ही ५.७९ लाख रुपये ते ८.०४ लाख रुपये आहे. तर डिझेलवर चालणाऱ्या ऑराची किंमत ही ७.७३ लाख रुपये ते ९.२२ लाख रुपये आहे. तर १ लिटर टर्बो पेट्रोलच्या चारचाकीची किंमत ही ८.५४ लाख रुपये आहे. १.२ लिटर सीएनजीवर चालणाऱ्या चारचाकीची किंमत ७.२८ लाख रुपये आहे.

हेही वाचा-आर्थिक कसरत : केंद्र सरकार आरबीआयकडून 'एवढे' कोटी रुपये घेण्याची शक्यता

सेडान श्रेणीत डिझायर आणि अमेझ या चारचाकींचे दशकभरापासून वर्चस्व आहे. ह्युदांईच्या नव्या मॉडेलने चारचाकींच्या विक्रीत सुधारणा होणार असल्याचे ह्युंदाई मोटर इंडियाचे व्यवस्थापकीय संचालक एस. एस. किम यांनी सांगितले. ऑरा ही मारुती सुझुकीची डिझायर आणि होंडा अमेझ, फोर्डची अॅस्पायरबरोबर स्पर्धा करणार आहे. या प्रतिस्पर्धी कंपन्यांच्या चारचाकींची किंमत ही ५.८२ लाख ते ९.७९ लाख रुपये आहे.

हेही वाचा-डेबिट कार्ड नसले तरी एटीएममधून काढता येणार पैसे, 'या' बँकेची सुविधा

Intro:Body:

Dummy Business news

Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.