नवी दिल्ली - केंद्र सरकारने सर्व प्रकारच्या कांद्याच्या निर्यातीवरील निर्बंध आज काढले आहेत. त्यामुळे १ जानेवारी २०२१ पासून कांदा निर्यातीचा मार्ग खुला होणार आहे.
केंद्र सरकारने कांद्याच्या वाढत्या किमतीच्या पार्श्वभूमीवर सप्टेंबरमध्ये निर्यात बंदी केली होती. विदेश व्यापार महासंचालनालयाने आज परिपत्रक काढून कांदा निर्यात बंदी रद्द केली आहे. विदेश व्यापार महासंचालनालयाकडून आयात-निर्यातीसाठी देखरेख केली जाते.
हेही वाचा-डिश टिव्हीला 4,164 कोटी रुपये भरण्याची केंद्राकडून नोटीस
देशात वाढले होते कांद्याचे दर
कांद्याचे सर्वाधिक उत्पादन होणाऱ्या महाराष्ट्र व कर्नाटकला यंदा अतिवृष्टीचा फटका बसला आहे. पावसाने कांदा पिकाचे नुकसान झाल्याने बाजारपेठेत नव्या कांद्याची आवक कमी झाली होते. अशा परिस्थितीमुळे कांद्याचे दर पुण्यासह काही जिल्ह्यांत प्रति किलो १०० रुपयापर्यंत पोहोचले होते. नाफेडने १५ हजार टन कांदा खरेदीच्या निविदा आयातदारांकडून मागविल्या होत्या.
हेही वाचा-year Ender 2020: उद्योगजगताच्या वर्षभरातील ठळक घडामोडींचा मागोवा