नवी दिल्ली - सोन्याच्या दरात प्रति तोळा ४५ रुपयांनी वाढ झाली आहे. या दरवाढीनंतर सोन्याचे दर प्रति तोळा ४४,४८१ रुपये आहेत. ही माहिती एचडीएफसी सिक्युरिटीजने दिली आहे. मागील सत्रात सोन्याचा दर प्रति तोळा ४४,४३६ रुपये होता.
सोन्यापाठोपाठ चांदीचेही दर वधारले आहेत. चांदीचा दर प्रति किलो ११६ रुपयांनी वधारून ६६,७४० रुपये आहे. मागील सत्रात चांदीचा दर प्रति किलो ६६,६२४ रुपये होता. एचडीएफसी सिक्युरिटीजचे वरिष्ठ विश्लेषक (कमोडिटीज) तपान पटेल यांच्या माहितीनुसार दिल्लीत २४ कॅरेट सोन्याचा दर प्रति तोळा ४५ रुपयांनी वाढला आहे.
हेही वाचा-वित्तीय कंपन्यांच्या शेअरमध्ये घसरण ; शेअर बाजारासह निफ्टीला किंचित फटका
ऐन लग्नसराईच्या काळात सोने-चांदीच्या दरात घसरण-
ऐन लग्नसराईच्या काळात सोन्याचे दर घसरले आहेत. मध्यंतरी सोन्याचे दर उच्चांकी पातळीवर पोहोचल्याने सोने खरेदी मंदावली होती. यापुढेदेखील सोन्याचे दर कमी होण्याची शक्यता आहे.
हेही वाचा-देशव्यापी संप: दुसऱ्या दिवशी विदेशी बँकांमधील कर्मचाऱ्यांचाही सहभाग