नवी दिल्ली - सोन्याचा दर प्रति तोळा १,१५५ रुपयांनी वधारून ४४,३८३ रुपये झाले आहेत. कोरोनाची देशातील रुग्णांची वाढती संख्या आणि रुपयाची डॉलरच्या तुलनेत झालेली घसरण या कारणांनी सोन्याचे दर वाढल्याचे एचडीएफसी सिक्युरिटीजने म्हटले आहे.
सोन्याचा दर बुधवारी बाजार बंद होताना प्रति तोळा ४३,२२८ रुपये होता. चांदीचा दर प्रति किलो १,१९८ रुपयांनी वधारून ४७,७२९ रुपये झाला आहे. मागील सत्रात चांदीचा दर प्रति किलो ४६,५३१ रुपये होता.
दरम्यान, सोन्यामधील गुंतवणूक ही सर्वात सुरक्षित मानली जाते. जागतिक आर्थिक मंचावरील स्थिती आणि कोरोनाने होणारा अर्थव्यवस्थेवर परिणाम या कारणांना गुंतवणूकदारांनी सोन्यामध्ये गुंतवणूक करण्यास सुरुवात केली आहे.
हेही वाचा-पुरवणी मागण्यांनी राज्य सरकारच्या वित्तीय शिस्तीला 'ग्रहण'