ETV Bharat / business

जागतिक अनिश्चिततेने सोने पुन्हा महागले; जाणून घ्या आजचा दर - Gold rate today

जगभरात आर्थिक स्थिती अस्थिर आहे. त्यामुळे गुंतणूकदार सोन्याकडे वळत असल्याचे कोलकातामधील ज्वेलर्स बच्छराज बमलवा यांनी सांगितले. सोन्यातील गुंतवणूक अत्यंत सुरक्षित मानली जाते. त्यामुळे अनिश्चिततेच्या काळात गुंतवणूकदार सोन्यामध्ये गुंतवणूक करत असल्याचे बमलवा यांनी सांगितले. असे असले तरी टाळेबंदीत इटली आणि तुर्कीमधून सोन्याची फा

सोन्याचे दर
सोन्याचे दर
author img

By

Published : May 20, 2020, 4:08 PM IST

नवी दिल्ली - आर्थिक अनिश्चिततेमुळे देशात सोने आज पुन्हा महागले आहे. सध्या जूनच्या सौद्यांसाठी एमसीएक्समध्ये सोन्याचा दर प्रति तोळा ४७ हजार २७५ रुपये आहे. हा दर मागील सत्राच्या तुलनेत प्रति तोळा २२५ रुपयांनी अधिक आहे.

कोमेक्सवर जूनच्या सौद्यात सोन्याचा दर प्रति औंस १ हजार ७५२ डॉलर आहे. हा दर मागील सत्राहून ०.४ टक्के अधिक आहे. जगभरात आर्थिक स्थिती अस्थिर आहे. त्यामुळे गुंतणूकदार सोन्याकडे वळत असल्याचे कोलकातामधील ज्वेलर्स बच्छराज बमलवा यांनी सांगितले. सोन्यातील गुंतवणूक अत्यंत सुरक्षित मानली जाते. त्यामुळे अनिश्चिततेच्या काळात गुंतवणूकदार सोन्यामध्ये गुंतवणूक करत असल्याचे बमलवा यांनी सांगितले. असे असले तरी टाळेबंदीत इटली आणि तुर्कीमधून सोन्याची फारशी मागणी नसल्याचेही त्यांनी सांगितले.

हेही वाचा-फेसबुकसह इन्स्टाग्रामवर ऑनलाईन शॉप सुरू करण्याची मिळणार सुविधा

सध्या देशात सोन्याचा दर प्रति तोळा ४८ हजार ९०० रुपये आहे. तर मागील सत्रात सोन्याचा दर प्रति तोळा ४८ हजार ५०० रुपये होता. एमसीएक्समध्ये जुलैमधील चांदीच्या सौद्यासाठी प्रति किलो ४९ हजार ४५० रुपये दर आहे. हा दर मागील सत्राच्या तुलनेत प्रति प्रति किलो ६२९ रुपयांनी जास्त आहे.

हेही वाचा-चौथ्या टाळेबंदीत कॅबला परवानगी; वाहन चालकांची 'ही' आहे समस्या

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.