ETV Bharat / business

सोन्याची झळाळी फिक्की; प्रति तोळा ७१६ रुपयांची घसरण - gold rate latest news

चांदीचे दर प्रति किलो १,२७४ रुपयांनी घसरून ६८,२३९ रुपये आहेत. मागील सत्रात चांदीचा दर प्रति किलो ६९,५१३ रुपये होता.

सोने दर न्यूज
सोने दर न्यूज
author img

By

Published : Feb 17, 2021, 4:46 PM IST

नवी दिल्ली - सोन्याच्या दरात दिल्लीत प्रति तोळा (१० ग्रॅम) ७१७ रुपयांची घसरण झाली आहे. या घसरणीनंतर सोन्याचे दर प्रति तोळा ४६,१०२ रुपये आहे. जागतिक बाजारात मौल्यवान धातुंचे दर घसरल्याने सोन्याचे दर घसरल्याचे एचडीएफसी सिक्युरिटीजने म्हटले आहे.

मागील सत्रात सोन्याचे दर प्रति तोळा १० ग्रॅमने घसरून ४६,८१९ रुपये होते. चांदीचे दर प्रति किलो १,२७४ रुपयांनी घसरून ६८,२३९ रुपये आहेत. मागील सत्रात चांदीचा दर प्रति किलो ६९,५१३ रुपये होता.

हेही वाचा-मूल्याकंनापलीकडे जाऊन विचार करा- पंतप्रधानांचा स्टार्टअप संस्थापकांना सल्ला

एचडीएफसी सिक्युरिटीजचे (कमोडिटीज) वरिष्ठ विश्लेषक तपान पटेल म्हणाले की, दिल्लीत २४ कॅरेट स्पॉट सोन्याचे दर प्रति १० ग्रॅमला ७१७ रुपयांनी घसरले आहेत. जागतिक बाजारपेठेत सोन्याचे दर घसरले आहेत. आंतरराष्ट्रीय बाजारात सोन्याचे दर घसरून प्रति औंस १,७८६ डॉलर आहेत. तर चांदीचे दर स्थिर राहून प्रति औंस २७.१० डॉलर आहेत.

दरम्यान, अस्थिरतेच्या काळातही सोन्यामधील गुंतवणूक ही सर्वाधिक सुरक्षित मानली जाते. मात्र, कोरोनाचे जगभरात सुरू झालेले लसीकरण आणि अनेक देशांच्या अर्थव्यवस्था सावरत असताना सोन्यामधील गुंतवणुकीचे प्रमाण कमी होत आहे.

हेही वाचा- महागाईचा 'कळस': नऊ दिवसात पेट्रोल-डिझेल ३ रुपयांनी महाग

मौल्यवान रत्ने आणि दागिन्यांच्या निर्यातीत घसरण-

मौल्यवान रत्ने आणि दागिन्यांच्या निर्यातीत जानेवारीत ७.८ टक्क्यांची घसरण झाली आहे. जानेवारीत मौल्यवान रत्ने आणि दागिन्यांची एकूण २.७ अब्ज डॉलरची निर्यात झाली आहे. गतवर्षी जानेवारीत २.९ अब्ज डॉलरची निर्यात झाल्याची माहिती जेम्स ज्वेलरी एक्सपोर्ट प्रमोशन काउन्सिल (जीजेईपीसी) दिली आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.