ETV Bharat / business

चांदी प्रति किलो १,१४८ रुपये महाग; सोन्याच्या दरातही वाढ - सोने दर न्यूज

सोन्याच्या दरापाठोपाठ चांदीच्या दरातही वाढ झाली आहे. चांदीचे दर प्रति किलो 1,148 रुपयांनी वाढून 71,432 रुपये आहे.

gold rate news
सोने दर न्यूज
author img

By

Published : Jun 11, 2021, 7:43 PM IST

नवी दिल्ली - गेले काही दिवस सोने-चांदीच्या दरात सातत्याने चढ-उतार सुरू आहे. सोन्याचे दर दिल्लीत प्रति तोळा 441 रुपयांनी वधारले आहेत. या दरवाढीनंतर सोन्याचा दर प्रति तोळा 48,530 रुपये असल्याचे एचडीएफसी सिक्युरिटीजने माहिती दिली आहे.

मागील सत्रात सोन्याचा दर दिल्लीत प्रति तोळा 48,089 रुपये होता. सोन्याच्या दरापाठोपाठ चांदीच्या दरातही वाढ झाली आहे. चांदीचे दर प्रति किलो 1,148 रुपयांनी वाढून 71,432 रुपये आहे. मागील सत्रात चांदीचा दर प्रति किलो 70,284 रुपये होता.

हेही वाचा-मुंबई शेअर बाजाराचा आजपर्यंतचा विक्रम; दिवसाखेर 52,641 निर्देशांक

आंतरराष्ट्रीय बाजारात सोन्याच्या दरात किंचित वाढ

आंतरराष्ट्रीय बाजारात सोन्याच्या दरात किंचित वाढ होऊन सोन्या दर प्रति औंस 1,896 डॉलर आहे. तर चांदीचे स्थिर राहून प्रति औंस 28.15 डॉलर आहे. एचडीएफसी सिक्युरिटीजचे वरिष्ठ विश्लेषक (कमोडिटीज) तपान पटेल म्हणाले, की सोन्याच्या दरात कोमेक्समध्ये (न्यूयॉर्कस्थित कमोडिटी एक्सचेंज) किंचित वाढ झाली आहे. या बाजारात सोने प्रति औंस 1,896 डॉलर राहिले आहे.

हेही वाचा-...म्हणून कोव्हॅक्सिनला अमेरिकेकडून नाही मिळाली मंजुरी

15 जूननंतर सोन्यावर हॉलमार्किंग अनिवार्य -

केंद्र सरकारने 15 जून नंतर सोन्यावर हॉलमार्किंग अनिवार्य केले आहे. केंद्राच्या या निर्णयाचं काही सराफा व्यापाऱ्यांनी स्वागत केलंय. दरम्यान, त्यांच्या काही मागण्यादेखील आहेत. कोरोनामुळे दुकाने बंद असल्याने व्यवसाय ठप्प आहे. त्यामुळे आधीचा स्टॉक विक्रीअभावी दुकानातच आहे. या मालाची विक्री करण्यासाठी सराफा व्यापारी सरकारकडून सहा महिन्यांची मुदतवाढ मागत आहेत.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.