नवी दिल्ली - सोन्याची किंमत राजधानीत प्रति तोळा (१० ग्राम) २२५ रुपयांनी वाढून ३८,७१५ रुपये झाली आहे. लग्नसराई आणि आंतरराष्ट्रीय पातळीवर सोन्याचे वाढलेले दर यांचा एकत्रित परिणाम झाल्याने सोन्याची किंमत वाढली आहे. सोन्याचा दर मंगळवारी प्रति तोळा ३८,४९० रुपये होता.
एचडीएफसी सिक्युरिटीजचे वरिष्ठ विश्लेषक तपान पटेल म्हणाले, रुपयाचे घसरलेल्या मूल्याने सोन्याचे दर वाढले आहेत. रुपया डॉलरच्या तुलनेत आज ३० पैशांनी घसरून ७१.७७ वर पोहोचला. अमेरिका-चीनमधील व्यापार युद्ध आणि हाँगकाँगमधील राजकीय अस्थिरता या कारणांनी रुपयाची घसरण झाली आहे.
हेही वाचा-'फेसबुक पे' अमेरिकेत लाँच; जाणून घ्या, अधिक माहिती
चांदीच्या भावातही वाढ-
चांदीची किंमत ही प्रति किलो ४४४ रुपयांनी वाढून ४५ हजार ४८० रुपये झाली आहे. मागील सत्रात चांदीची किंमत ही प्रति किलो ४५ हजार ४० रुपये होती.
हेही वाचा-'या' शहरामधील घरांच्या विक्रीकरता लागतात सुमारे ४४ महिने
जागातिक बाजारपेठेत सोन्याची किंमत प्रति औस ही १ हजार ४६१ रुपये डॉलरने वाढली आहे. तर चांदी प्रति औस ही १६.९० डॉलरने वाढली आहे. अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या संदिग्ध भूमिकेने अमेरिका-चीनमधील व्यापारी कराराबाबत अनिश्चितता निर्माण झाली आहे. त्यामुळे जगभरातील गुंतवणूकदारांची चिंता वाढली आहे.