नवी दिल्ली - सोन्याचे दर फ्युच्युअर ट्रेडमध्ये प्रति तोळा ४७९ रुपयांनी महागले आहेत. त्यामुळे सोने प्रति तोळा ४७,८६० रुपयावर पोहोचले आहे. स्पॉट मार्केटमध्ये सोन्याचा दर प्रति तोळा ५० हजार रुपयापर्यंत पोहोचले आहेत.
मल्टी-कमोडिटी एक्सचेंजमध्ये सोन्याचे दर जूनसाठी प्रति तोळा ४७९ रुपयांनी वधारून ४७,८६० रुपये झाला आहे. न्यूयॉर्कमध्ये सोन्याचे दर प्रति औंस ०.९५ टक्क्यांनी वधारून १,७७३ डॉलरवर पोहोचला आहे.
हेही वाचा-GRAPHICS : जाणून घ्या, केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी घोषणा केलेले आर्थिक पॅकेज
दरम्यान, सोन्यातील गुंतवणूक अत्यंत सुरक्षित मानली जाते. कोरोनाच्या संकटामुळे गुंतवणूकदारांची चिंता वाढली आहे. त्यामुळे जगभरातील गुंतवणूकदारांनी सोन्यामध्ये गुंतवणूक करण्यास पसंती दर्शविली आहे.
हेही वाचा-सरकारने आर्थिक पॅकेज जाहीर करूनही मुंबई शेअर बाजारात १,०६९ अंशांनी पडझड