नवी दिल्ली - सोन्याचे दर नवी दिल्लीत प्रति तोळा ३८५ रुपयांनी वाढून ४९,६२४ रुपये आहे. जागतिक बाजारात सोन्याचे दर वाढल्याने हा बदल झाल्याचे एचडीएफसी सिक्युरिटीजने म्हटले आहे.
मागील सत्रात सोन्याचा दर प्रति तोळा ४९, २३९ रुपये होता. चांदीचा प्रति किलो १,१०२ रुपयांनी वधारून ६६,९५४ रुपये आहे. मागील सत्रात चांदीचा दर प्रति किलो ६५,८५२ रुपये होता.
एचडीएफसी सिक्युरिटीजचे वरिष्ठ विश्लेषक तपान पटेल म्हणाले की, डॉलरचे मूल्य कमी झाल्याने सोन्याच्या किमती वाढल्या आहे. कोरोनाच्या नव्या प्रकाराने टाळेबंदीची जगभरात भीती निर्माण झाली आहे.
हेही वाचा-अनधिकृत डिजीटल अॅपवरून कर्ज घेताना सावध! आरबीआयकडून जनतेला इशारा
आयातीत घट -
चालू आर्थिक वर्षात एप्रिल ते ऑक्टोबर या काळात सोन्याच्या आयातीमध्ये लक्षणीय घट नोंदवली गेली. 9.28 अब्ज डॉलर्स किंमतीच्या सोन्याची आयात करण्यात आली. मागील आर्थिक वर्षाच्या तत्सम कालावधीपेक्षा ही आयात 47.42 टक्क्यांनी कमी आहे. कोरोना महामारी आणि जागतिक बाजारपेठचा सोन्यासह चांदीच्या दरावर परिणाम होत आहे.
हेही वाचा-शक्तीकांत दास यांची बँकांच्या व्यवस्थापकीय संचालकांशी कर्जाच्या व्याजदराबाबत चर्चा