नवी दिल्ली - सोने खरेदी करणाऱ्यांसाठी आनंदाची बातमी आहे. सोने प्रति तोळा १७० रुपयाने घसरून ३८,३९० झाले आहे. केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी कॉर्पोरेट कर कपातीची घोषणा केल्याने सोन्याचे दर घसरले आहेत.
चांदीचा दर प्रति किलो हे १२० रुपयाने घसरून ४७,५८० रुपये झाला आहे. गुरुवारी चांदीचा दर प्रति किलो ४७,७०० रुपये होता. सोन्याचा गुरुवारी ३८,५०६ रुपये प्रति तोळा दर होता.
हेही वाचा-कॉर्पोरेट करातील कपातीने शेअर बाजाराची विक्रमी २२०० अंशाची उसळी! उद्योगातही उत्साह
केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी कॉर्पोरेट करात कपात केल्यानंतर दिल्लीत २४ कॅरट सोन्याचा दर प्रति तोळा १७० रुपयाने घसरले आहेत. तर रुपयाही डॉलरच्या तुलनेत ४० पैशांनी वधारल्याचे एचडीएफसी सिक्युरिटीजचे वरिष्ठ विश्लेषक तपान पटेल यांनी सांगितले.
हेही वाचा-केंद्रीय अर्थमंत्र्यांच्या 'बूस्ट'ने शेअर बाजारात १६०० अंशाची उसळी
रुपया हा डॉलरच्या तुलनेत सकाळच्या सत्रात ६६ पैशांनी वधारून ७०.६८ वर पोहोचला होता. केंद्र सरकारच्या निर्णयानंतर सर्व अधिभार आणि उपकरासह २५.१७ टक्के कॉर्पोरेट कर भारतीय कंपन्यांना लागू होणार आहे. शेअर बाजार निर्देशांक दुपारनंतर २२८४.५५ अंशाने वधारला आहे.