ETV Bharat / business

रुपया वधारल्याचा परिणाम; सोन्याच्या दरात अंशत: घसरण - सोने किंमत न्यूज

सोन्याचा दर दिल्लीत प्रति तोळा ४७,५७६ रुपये आहे. तर मागील सत्रात सोन्याचा दर प्रति तोळा ४७,६१४ रुपये आहे.

सोने दर न्यूज
सोने दर न्यूज
author img

By

Published : Feb 10, 2021, 7:45 PM IST

नवी दिल्ली - सोन्याच्या दरामध्ये दिल्लीत प्रति तोळा (१० ग्रॅम) ३८ रुपयांनी घसरले आहेत. रुपयाचे मूल्य डॉलरच्या तुलनेत वधारल्याने सोन्याच्या किमतीवर परिणाम झाल्याचे एचडीएफसी सिक्युरिटीजने म्हटले आहे.

सोन्याचा दर दिल्लीत प्रति तोळा ४७,५७६ रुपये आहे. तर मागील सत्रात सोन्याचा दर प्रति तोळा ४७,६१४ रुपये आहे. चांदीचा दर दिल्लीत प्रति किलो ७८३ रुपयांनी घसरून ६८,८८४ रुपये आहे. मागील सत्रात चांदीचा दर प्रति किलो ६९.६६७ रुपये होता.

हेही वाचा-दिलासादायक! फास्टॅग वॉलेटवरील किमान रकमेची अट रद्द

एचडीएफसी सिक्युरिटीजचे विश्लेषक तपान पटेल म्हणाले की, रुपयाचे मूल्य वधारल्याने सोन्याच्या किमतीवर दबाव होता. त्यामुळे सोन्याच्या दरात किंचित घसरण झाली आहे. रुपयाचे मूल्य डॉलरच्या तुलनेत ३ पैशांनी वाढून एका डॉलरकरता ७२.८४ रुपये आहे. अमेरिकेत आर्थिक पॅकेज जाहीर होण्याची आशा आणि डॉलरचे घसरलेले मूल्य या कारणांनी जागतिक बाजारातील सोन्याच्या किमतीवर परिणाम झाला. कॉमेक्स स्पॉट गोल्डमध्ये सोन्याचे दर १,८२० डॉलरपर्यंत वाढू शकतात, असा पटेल यांनी अंदाज केला.

हेही वाचा-'नवीन कृषी कायद्यांची अंमलबजावणी करण्याकरता सरकार वचनबद्ध'

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.