नवी दिल्ली - सोन्याच्या किमतीत दिल्लीत आज प्रति तोळा (१० ग्रॅम) ३२० रुपयांनी घसरण झाली आहे. या घसरणीनंतर सोन्याचे दर प्रति तोळा ४५,८६७ रुपये आहेत. मागील सत्रात सोन्याचा दर प्रति तोळा ४६,१८७ रुपये आहे.
चांदीच्या दरात अंशत: वाढ झाली आहे. चांदीचा दर प्रति किलो २८ रुपयांनी वाढून ६८,२८३ रुपये आहे. मागील सत्रात चांदीचा दर प्रति किलो ६८,२५५ रुपये आहे. आंतरराष्ट्रीय बाजारात सोन्याचे दर वधारून प्रति औंस १,७८० डॉलर आहेत. तर चांदीचा दर स्थिर राहून प्रति औंस २७.१६ डॉलर आहेत.
हेही वाचा-दिवसाखेर मुंबई शेअर बाजारात विक्रीचा दबाव; निर्देशांकात ३७९ अंशाने घसरण
कोरोनाविरोधातील लसीकरण मोहिमेनंतर सोन्याच्या दरात घसरण सुरू-
गतवर्षी दिवाळीच्या दरम्यान सोन्याचे दर प्रति तोळा ५० हजार रुपयांहून अधिक झाले होते. मात्र, कोरोनाविरोधातील लसीकरण मोहिम, जागतिक बाजारातील सकारात्मक स्थिती या कारणांनी सोन्याच्या दरात घसरण होत आहे. केंद्रीय अर्थसंकल्पातही सोने-चांदीवरील आयात शुल्कात कपात केली आहे. त्यामुळेही सोने-चांदीच्या दरात घसरण झाली आहे. सोन्यामधील गुंतवणूक ही सुरक्षित मानली जाते. कोरोना महामारीतून भारतासह जगभरातील देशांच्या अर्थव्यवस्था सावरत आहे. अशा स्थितीत गुंतवणुकदारांनी जोखीम असलेल्या क्षेत्रातही गुंतवणुकीकडे प्राधान्य देण्यास सुरुवात केली आहे.
हेही वाचा-दिलासादायक! यंदा भारतीय कंपन्यांकडून सरासरी ७.३ टक्के होणार वेतनवाढ