नवी दिल्ली - सोन्याचे दर दिल्लीत पुन्हा घसरले आहेत. सोन्याचे दर प्रति तोळा 294 रुपयांनी घसरून 45,401 रुपये झाले आहेत. आंतरराष्ट्रीय बाजारात मौल्यवान धातुंच्या दरात घसरण झाली आहे. तसेच रुपया डॉलरच्या तुलनेत वधारल्याने सोन्याच्या दरात घसरण झाली आहे.
मागील सत्रात सोन्याचा दर हा प्रति तोळा 45,695 रुपये होता. सोन्याच्या दरात घसरण झाली असली तरी चांदीच्या दरात वाढ झाली आहे. चांदीचे दर प्रति किलो 26 रुपयांनी वाढून 59,609 रुपये आहेत. मागील सत्रात चांदीचा दर प्रति किलो 59,583 रुपये होता.
हेही वाचा-पीएम केअर्स हा भारत सरकारचा निधी नाही; पंतप्रधान कार्यालयाची दिल्ली उच्च न्यायालयात माहिती
दिल्लीत स्पॉट सोन्याचा दर हा 294 रुपयांनी घसरला आहे. कोमेक्समध्ये सोन्याचे दर घसरले आहेत. त्याचा परिणाम झाल्याचे एचडीएफसी सिक्युरिटीजचे वरिष्ठ विश्लेषक तपान पटेल यांनी सांगितले.
हेही वाचा-अबब..! ज्योतिरादित्य सिंधिया यांनी स्वत:चा मास्क माजी मंत्र्यांना घातला, पाहा व्हिडिओ..
रुपयाचे मूल्य हे डॉलरच्या तुलनेत 10 पैशांनी वाढवून 73.77 डॉलर आहेत. आंतरराष्ट्रीय बाजारात सोन्याचा दर स्थिर राहून 1,768 डॉलर आहे. तर चांदीचा दर स्थिर राहून 22.78 डॉलर आहेत.
हेही वाचा-मनोहर पर्रिकरांचा वारसा पुत्र उत्पल चालविणार; आमदार बाबुश मोन्सरातांकडून भाजपला सूचक इशारा
मुंबई शेअर बाजारात गुरुवारी तेजी-
शेअर बाजारातील तेजीमुळे आज पुन्हा एकदा मुंबई शेअर बाजाराच्या निर्देशांकाने विक्रम केला आहे. शेअर बाजाराचा निर्देशांक दिवसाखेर 958.03 अंशाने वधारून 59,885.36 वर स्थिरावला. हा आजपर्यंतचा सर्वोच्च निर्देशांक आहे. मुंबई शेअर बाजारात रिलायन्स इंडस्ट्रीज, एचडीएफसी ट्विन्स आणि आयसीआयसीआय बँकेचे शेअर वधारले आहेत. त्यामुळे शेअर बाजाराने विक्रमी निर्देशांक नोंदविला आहे.