नवी दिल्ली - फ्रँकलिन टेम्पलेटन म्युच्युअल फंडने बाजारातील चलनाची तरलता कमी झाल्याने सहा डेबिट फंड बंद केले आहेत. या गुंतवणूकदारांचे पैसे लवकरात लवकर देण्यात येतील, असे फ्रँकलिन भारतचे अध्यक्ष संजय सप्रे यांनी सांगितले.
डेबिट फंड बंद केले म्हणजे गुंतवणूकदारांचे पैसे बुडाल्याचा अर्थ होत नाही, असे फ्रँकलिन भारतचे अध्यक्ष संजय सप्रे यांनी म्हटले आहे. पुढे ते म्हणाले, की आम्ही सर्व गुंतवणूकदारांचे पैसे देण्यासाठी बांधील आहोत. आमच्या ब्रँडचा विश्वास पूर्ववत मिळवू, असेही ते म्हणाले. गुंतवणूकदारांनी वित्तीय सल्लागाराच्या सल्ल्याने गुंतवणूकीच्या ध्येयावर लक्ष केंद्रित करावे, अशी त्यांनी गुंतवणूकदारांना शिफारस केली आहे.
दरम्यान, भारतीय रिझर्व्ह बँकेने ५० हजार कोटी रुपयांची विशेष चलन तरलताची सुविधा म्युच्युअल फंडसाठीसाठी जाहीर केली आहे. फ्रँकलिन टेम्पलेटन म्युच्युअल फंडने सहा कर्ज योजना बंद केल्यानंतर आरबीआयने हा निर्णय घेतला आहे.
हेही वाचा-चीनच्या कोरोना किटमध्येही भारतीय कंपन्यांची नफेखोरी; कारवाईची काँग्रेसची मागणी
काय आहे फ्रँकलीन टेम्पलेटन प्रकरण-
देशात पहिल्यांदाच कोरोनाच्या संकटामुळे एखाद्या म्युच्युअल फंडने कर्ज योजना बंद केली आहे. अशीच समस्या ऑक्टोबर २००८ मध्ये पहिल्या आठवड्यात निर्माण झाली होती. त्यावेळी केंद्र सरकारने आरबीआय, सेबी, इंडियन बँक्स असोसिएशन, अॅम्फीशी तत्काळ चर्चा केली होती, अशी माहिती माजी केंद्रीय अर्थमंत्री पी. चिदंबरम यांनी दिली. केंद्र सरकारने म्युच्युअल फंडाच्या समस्येबाबत कार्यवाही करावी, अशी मागणी त्यांनी केंद्र सरकारकडे शनिवारी केली होती. दुसरीकडे वित्तीय मंत्रालयासह सेबीने फ्रँकलिनप्रकरणात हस्तक्षेप करावा, अशी शेअर दलाल संघटनेने मागणी केली आहे.
हेही वाचा-चीनच्या कोरोना किटमध्येही भारतीय कंपन्यांची नफेखोरी; कारवाईची काँग्रेसची मागणी