ETV Bharat / business

विदेशी गुंतवणुकदारांचा विश्वास कायम, जूनच्या पहिल्या आठवड्यात ७ हजार ९५ कोटींची गुंतवणूक - foreign investors

यापुढील काळात वित्तीय तुटीचे उद्दिष्ट आणि कर्ज घेण्याचे नियोजन या बाबीवर विदेशी गुंतवणुकदारांचे लक्ष राहणार आहे.

प्रतिकात्मक- गुंतवणूक
author img

By

Published : Jun 9, 2019, 1:29 PM IST

नवी दिल्ली - बहुमतामधील एनडीए सरकारच्या स्थापनेपासून विदेशी गुंतवणूकदार संस्थांनी गुंतवणुकीत सातत्य ठेवले आहे. विदेशी गुंतवणुकदारांनी जूनच्या पहिल्या आठवड्यात भांडवली बाजारात ७ हजार ९५ कोटींची गुंतवणूक केली आहे.

गेली चार महिने विदेशी गुंतवणुकदारांचा (एफपीआय) भांडवली बाजारातील निधी वाढला आहे.

एफपीआयने अशी केली गुंतवणूक-

महिना एफपीआयने भांडवली बाजारात केलेली गुंतवणूक (कोटीमध्ये)
मे ९.०३१.१५
एप्रिल १६,०९३
मार्च ४५,९८१
फेब्रुवारी ११,१८२

ग्रो कंपनीचे सीसीओ हर्ष जैन म्हणाले, जूनमध्ये एकही असा दिवस गेला नाही. त्यादिवशी भांडवली बाजारातील गुंतवणुकीचे प्रमाण हे काढून घेण्यात येणाऱ्या गुंतवणुकीहून कमी असेल. केंद्रात स्थापन झालेले स्थिर सरकार आणि वित्तीय तुटीचे उद्धिष्ट ३.४ टक्के पूर्ण होत असल्याने विदेशी गुंतवणूकदार संस्थांचा विश्वास वाढला आहे.

बजाज कॅपिटलेचे मुख्य संशोधक अलोक अग्रवाल म्हणाले, कच्च्या तेलाचे घसरलेले दर, अमेरिका-चीन व्यापारी युद्ध हे जागतिक आर्थिक मंचावरील मुद्दे भारताच्या पथ्यावर पडले आहेत. यापुढील काळात वित्तीय तुटीचे उद्दिष्ट आणि कर्ज घेण्याचे नियोजन या बाबीवर विदेशी गुंतवणुकदारांचे लक्ष राहणार असल्याचे त्यांनी सांगितले.

Intro:Body:

Buz 05

Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.