ETV Bharat / business

जागतिक बाजारात कच्च्या तेलाची घसरण; पेट्रोल-डिझेल आणखी स्वस्त होण्याची शक्यता - Covid surge impact on fuel rate

युरोपममध्ये कोरोनाची मोठी लाट आहे. त्याचा परिणाम म्हणून जागतिक अर्थव्यवस्था सावरण्यासाठी वेळ लागेल, अशी भीती व्यक्त करण्यात होत आहे.

Domestic fuel rates expected to fall
पेट्रोल-डिझेल आणखी स्वस्त होण्याची शक्यता
author img

By

Published : Mar 29, 2021, 5:34 PM IST

नवी दिल्ली - जागतिक बाजारात कच्च्या तेलाचे दर सोमवारी घसरले आहेत. त्यामुळे देशात पुन्हा पेट्रोल आणि डिझेलचे दर कमी होण्याची शक्यता आहे.

युरोपममध्ये कोरोनाची मोठी लाट आहे. त्याचा परिणाम म्हणून जागतिक अर्थव्यवस्था सावरण्यासाठी वेळ लागेल, अशी भीती व्यक्त करण्यात होत आहे. जागतिक बाजारात कच्च्या तेलाचे घसरत आहे. ब्रेंट क्रूड फ्युचरचे दर सोमवारी घसरून प्रति बॅरल 63 डॉलर आहेत. तसेच युएस क्रूड ट्रेडचे दर घसरले आहेत. डब्ल्यूटीआय क्रूड ऑईलचे दर 1.05 टक्क्यांनी घसरून प्रति बॅरल 59.92 डॉलर आहेत. तर ब्रेंट कच्च्या तेलाचे दर 0.78 टक्क्यांनी घसरून 63.65 डॉलर आहेत.

हेही वाचा-कोरोनाचा वाढता संसर्ग; सीरमकडून इतर देशांना लस मिळण्यास होणार उशीर

काय आहे तज्ज्ञांचे मत?

देशामध्ये कोरोनाबाधितांचे प्रमाण वाढत असताना रुपयाचे मूल्य डॉलरच्या तुलनेत कमकुवत होत आहे. जागतिक बाजारातील कच्च्या तेलाच्या दराप्रमाणे देशातील पेट्रोल आणि डिझेलचे दर ठरतात. अँजल ब्रोकिंगचे डीव्हीपी रिसर्चचे अनुज गुप्ता म्हणाले की, कोरोनाबाधितांचे प्रमाण वाढत असताना आणि मागणी कमी असल्याने कच्च्या तेलाचे दर कमी होण्याची शक्यता आहे. चीनमधून कच्च्या तेलाची कमी आयात होत असल्याचाही परिणाम होत आहे. दुसरीकडे कोरोनाबाधितांचे प्रमाण वाढत असताना रुपयाचे मूल्य घसरत आहेत. पेट्रोल आणि डिझेलच्या किमतीचा पुनर्आढावा घेतला जाण्याची शक्यता आहे.

हेही वाचा-पश्चिम बंगालमध्ये विधानसभा निवडणूक: आदरातिथ्य क्षेत्राला आले सुगीचे दिवस!

दिल्लीत पेट्रोलचा दर प्रति लिटर 90.78 रुपये आहे. तर डिझेलचा दर प्रति लिटर 81.10 रुपये आहे. देशातील काही राज्यांमध्ये पेट्रोल आणि डिझेलचा दर प्रति लिटर 100 रुपयांहून अधिक आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.