ETV Bharat / business

सोन्याच्या शुद्धतेचे प्रमाणीकरण करण्याकरता 1 जून 2021 पर्यंत मुदतवाढ - रामविलास पासवान न्यूज

सध्या, देशाच सोन्याचे प्रमाणीकरण करण्याचे प्रमाणपत्र घेणे हे ऐच्छिक आहे. मात्र, केंद्र सरकारने गतवर्षी सप्टेंबरमध्ये सोन्याचा प्रमाणीकरण बंधनकारक करण्याचे आदेश काढले होते. या आदेशाची अंमलबजावणी 15 जानेवारी 2021 पासून होणार असल्याचे सरकारने आदेशात म्हटले होते.

संग्रहित - सोने खरेदी
संग्रहित - सोने खरेदी
author img

By

Published : Jul 27, 2020, 6:29 PM IST

नवी दिल्ली – केंद्र सरकारने सोन्याच्या दागिन्यांसह कलाकृतींचे प्रमाणीकरण करण्याचे आदेश काढले होते. मात्र, कोरोना महामारीमुळे या आदेशाची अंमलबजावणी करण्याकरता सराफांना 1 जून 2021 पर्यंत मुदतवाढ दिली आहे. ही माहिती केंद्रीय ग्राहक व्यवहार मंत्री रामविलास पासवान यांनी दिली.

सध्या, देशाच सोन्याचे प्रमाणीकरण करण्याचे प्रमाणपत्र घेणे हे ऐच्छिक आहे. मात्र, केंद्र सरकारने गतवर्षी सप्टेंबरमध्ये सोन्याचा प्रमाणीकरण बंधनकारक करण्याचे आदेश काढले होते. या आदेशाची अंमलबजावणी 15 जानेवारी 2021 पासून होणार असल्याचे सरकारने आदेशात म्हटले होते. सरकारने सराफांना सोन्याचे प्रमाणीकरण आणि भारतीय मानक संस्थेकडे नोंदणी करण्यासाठी जवळपास वर्षभराचा अवधी दिला होता.

कोरोनाच्या संकटामुळे व्यापार विस्कळित झाले आहेत. त्यामुळे सराफांनी सोन्याचे प्रमाणीकरण करण्यासाठी मुदतवाढ द्यावी, विनंती केली होती. त्यामुळे मुदतवाढ दिल्याचे केंद्रीय ग्राहक व्यवहार मंत्री रामविलास यांनी सांगितले. पुढील वर्षी 1 जूनपासून सराफांना सोने केवळ 14,18 व 22 कॅरेटमध्येच विकण्याची परवानगी देण्यात येणार आहे.

ऑल इंडिया जेम आणि ज्वेलरी डोमेस्टिक काउन्सिलने (एजीजेडीसी) आणि इंडिया बुलियन आणि सराफ संघटनेनेही प्रमाणीकरणाकरता मुदतवाढ देण्याची सरकारकडे मागणी केली होती. एजीजेडीसीचे उपाध्यक्ष शंकर सेन म्हणाले, की टाळेबंदीत सराफांनी आधीच तीन महिने गमाविले आहेत. सोने विक्री पुन्हा रुळावर येण्यासाठी आणखी तीन ते चार महिने लागणार आहेत. त्यामुळे सोन्याचे प्रमाणीकरण करणे खूप कठीण जाणार आहे.

सध्या, देशात ८०० शुद्धतेचे प्रमाणीकरणाचे केंद्र आहेत. केवळ ४० टक्के सोन्याच्या शुद्धतेचे प्रमाणीकरण करण्यात येत असल्याची त्यांनी माहिती दिली.जागतिक व्यापारी संघटनेच्या नियमानुसार एखाद्या वस्तुच्या गुणवत्तेबाबत मानकात बदल करताना सदस्य देशाने त्या निर्णयाची माहिती कळविणे आवश्यक आहे. त्यानंतर पुढील प्रक्रियेसाठी दोन महिने लागतात.

काय आहे सोन्याच्या शुद्धतेचे प्रमाणीकरण

सोन्याच्या शुद्धतेचे प्रमाणीकरण (हॉलमार्किंग) हे मौल्यवान धातुच्या शुद्धतेचे प्रमाणपत्र आहे. त्यासाठी सध्या ऐच्छिक पद्धतीने सराफांकडून प्रमाणपत्र घेण्यात येते. ग्राहक व्यवहार मंत्रालयातर्गंत असलेल्या भारतीय मानक संस्था (बीआयएस) ही शुद्धतेचे प्रमाणपत्र देणारी प्रशासकीय संस्था आहे. या संस्थेकडून १४ कॅरट, १८ कॅरट आणि २४ कॅरट अशा तीन श्रेणीत सोन्याचा दर्जाचा निश्चित करण्यात येतो.जगात सर्वात अधिक सोन्याची भारतात आयात केली जाते. साधारणत: दरवर्षी ७०० ते ८०० टन सोन्याची आयात करण्यात येते.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.