मुंबई - शेअर बाजार निर्देशांक ११४ अंशांनी वधारून ३१,१८८.७९वर स्थिरावला. तर निफ्टीचा निर्देशांक ३९.७० अंशांनी वधारून ९,१०६.२५वर स्थिरावला. एफएमसीजी, ऑटो आणि आयटी कंपन्यांचे शेअर वधारले आहेत.
अर्थव्यवस्था हळुहळू सुरू करण्यात येत असल्याने शेअर बाजारात सकारात्मक परिणाम दिसून आला.
हेही वाचा-'रेल्वेची तिकीट खिडकी दोन ते तीन दिवसांत सुरू होणार'
या कंपन्यांचे वधारले-घसरले शेअर -
आयटीसीचे शेअर सर्वाधिक ७ टक्क्यांहून अधिक वधारले आहेत. एशियन पेंट्स, हिरो मोटोकॉर्प, मारुती, बजाज ऑटो, सनफार्मा, टीसीएस आणि एचसीएल टेकचे शेअर वधारले आहेत. तर इंडसइंड बँक, एनटीपीसी, बजाज फायनान्स, एचडीएफसी आणि एल अँड टीचे शेअर घसरले आहेत.
हेही वाचा-इंडियाबुल्सकडून २ हजार कर्मचाऱ्यांच्या नोकरीला कात्री; सोशल मीडियात संताप
अर्थव्यवस्था हळूहळू खुली होत असल्याने अर्थव्यवस्था पूर्वपदावर येण्याची आशा दिसून येत असल्याचे आनंद राठीचे प्रमुख नरेंद्र सोळंकी यांनी सांगितले. कोरोनाचे संकट आणि अमेरिका-चीनमधील तणावाचे संबंध यामुळे गुंतवणूकदारांना चिंता कायम असल्याचे बाजार विश्लेषकांनी सांगितले.