ETV Bharat / business

मुंबई शेअर बाजार : एकाच दिवशी घसरणीसह सावरण्याचा विक्रम - निफ्टी

मुंबई शेअर बाजार बंद होताना निर्देशांक १,३२५.३४ अंशांनी घसरून ३४,१०३.४८ वर स्थिरावला. मागील सत्रात मुंबई शेअर बाजार बंद होताना ३२,७७८.१४ वर स्थिरावला होता. तर निफ्टी ५० या राष्ट्रीय शेअर बाजाराचा निर्देशांक ३६५.०५ अंशांनी वधारून ९,९५५.२० वर स्थिरावला.

Representative
प्रतिकात्मक
author img

By

Published : Mar 13, 2020, 4:53 PM IST

Updated : Mar 13, 2020, 5:54 PM IST

मुंबई - सकाळच्या सत्रात सुमारे ३,८०० अंशांच्या घसरणीनंतर शेअर बाजार सावरला आहे. त्यामुळे शेअर बाजाराने एकाच दिवशी सर्वात मोठ्या घसरणीसह सावरण्याचा विक्रम केला आहे.

मुंबई शेअर बाजार बंद होताना निर्देशांक १,३२५.३४ अंशांनी वधारून ३४,१०३.४८ वर स्थिरावला. मागील सत्रात मुंबई शेअर बाजार बंद होताना ३२,७७८.१४ वर स्थिरावला होता. तर निफ्टी ५० या राष्ट्रीय शेअर बाजाराचा निर्देशांक ३६५.०५ अंशांनी वधारून ९,९५५.२० वर स्थिरावला.

हेही वाचा-वाहन उद्योगावरील मंदीचे सावट कायम; फेब्रुवारीत वाहन विक्रीत १९ टक्के घसरण

दोन्ही शेअर बाजारात १० टक्क्यांनी घसरण झाल्यानंतर सकाळी ४५ मिनिटांसाठी लोअर सर्किट लावण्यात आला होता. त्यानंतर १० वाजून २० मिनिटाला शेअर बाजाराचे व्यवहार पुन्हा सुरू करण्यात आले. शेअर बाजाराच्या सकाळच्या सत्रात २००८ नंतर सर्वात अधिक आज घसरण झाली आहे.

हेही वाचा-कोरोनाच्या संकटाने 'या' उद्योगांना मोठी संधी

आशियातील बहुतांश शेअर बाजारात घसरण झाल्याचे दिसून आले. गुरुवारी अमेरिकेचा शेअर बाजार, डो जोन्स इंडस्ट्रीअल अॅव्हरेज आणि एस अँड पी ५०० च्या शेअरमध्ये लोअर सर्किट असताना ७ टक्के घसरण झाली होती.

या कंपन्यांचे वधारले-घसरले शेअर

स्टेट बँक ऑफ इंडियाचे सर्वाधिक १३ टक्क्यापर्यंत शेअर वधारले आहेत. त्यापाठोपाठ टाटा स्टील, एचडीएफसी, सन फार्मा, बजाज फायनान्स, भारती एअरटेल आणि आयसीआयसीआय बँकेचे शेअर वधारले आहेत.

तर दुसरीकडे नेस्ले इंडिया, एशियन पेंट्स, एचयूएल, हिरो मोटोकॉर्प आणि एचसीएल टेक इंडियाचे शेअर घसरले आहेत.

Last Updated : Mar 13, 2020, 5:54 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.