नवी दिल्ली - विमान इंधनाच्या किमतीत आज ३.७ टक्क्यांनी वाढ झाली आहे. आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाचे दर वाढले आहेत. त्यामुळे एकाच महिन्यात तिसऱ्यांदा विमान इंधनाच्या किमतीत वाढ झाली आहे.
विमान इंधनाचे दर दिल्लीत प्रति किलोलीटर १,८१७.६२ रुपयांनी म्हणजे ३.६९ टक्क्यांनी वाढून प्रति किलो लिटर ५०,९७८.७८ रुपये आहेत. ही दरवाढ सरकारी तेल कंपन्यांनी जाहीर केली आहे. यापूर्वी सरकारी तेल कंपन्यांनी १ डिसेंबर २०२० ला विमान इंधनाच्या दरात प्रति लिटर ७.६ टक्क्यांनी वाढ केली होती. तर १६ डिसेंबरला विमान इंधनाच्या दरात प्रति लिटर ६.३ टक्क्यांनी वाढ केली होती.
- विमान इंधनाच्या किमतीचा दर महिन्याच्या १ आणि १६ तारखेला आढावा घेतला जातो. आंतरराष्ट्रीय बाजारातील कच्च्या तेलाचा दर आणि विदेश विनियम दर यांचा आधार घेऊन विमान कंपन्यांकडून विमान इंधनाचे दर पंधरवड्याला जाहीर केले जातात.
- मुंबईत शुक्रवारी विमान इंधनाचा दर प्रति किलोलीटर ४७,२६६.०२ वरून ४९,०८३.६५ रुपये आहे. स्थानिक करानुसार विमान इंधनाचा दर हा विविध राज्यांत भिन्न आहे. विमान कंपन्यांचा एकूण खर्चापैकी ४० टक्के खर्च हा विमान इंधनावर होतो. विमान इंधनाचे दर वाढल्याने विमान कंपन्यांच्या आर्थिक खर्चात मोठी वाढ होणार आहे.
- गेल्या महिन्यात घरगुती गॅस सिलिंडरचे (एलपीजी) दर १०० रुपयांनी वाढले आहे. हे दर शुक्रवारी स्थिर राहिले आहेत. विनाअनुदानित गॅस सिलिंडरचा (१४.२ किलो) दर प्रति सिलिंडर ६९४ रुपये आहे.
हेही वाचा-पीएफ खात्यावर ८.५ टक्क्यांचे व्याज १ तारखेपासून होणार जमा
ग्राहकांना घरगुती गॅस सिलिंडरवर मे महिन्यापासून अनुदान मिळाले नाही. कारण, आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाचे दर घसरले आहेत. त्यामुळे गॅस सिलिंडरचे दर कमी झाल्याने सरकारने अनुदान ग्राहकांच्या खात्यावर जमा केले नाही. दिल्लीत गतवर्षी जूनमध्ये अनुदानित घरगुती गॅस सिलिंडरची किंमत ४९७ रुपये आहे. त्यानंतर गॅस सिलिंडरची किंमत एकूण १४७ रुपयाने वाढली होती. डिसेंबरमध्ये गॅस सिलिंडरच्या किमती वाढल्याने सरकारला अनुदान द्यावे लागणार आहे. दुसरीकडे पेट्रोलआणि डिझेलच्या किमतीचा दररोज आढावा घेतला जातो. पेट्रोल-डिझेलचे दर गेल्या २५ दिवसांपासून स्थिर राहिले आहेत.
हेही वाचा-महामारीच्या काळात गुंतवणुकदारांच्या संपत्तीत ३२.४९ लाख कोटींची वाढ