सॅन फ्रान्सिस्को - भारतामध्ये अॅपलच्या उत्पादनांची विक्री चांगली वाढत आहे. या पार्श्वभूमीवर पहिले ब्रँडेड किरकोळ विक्री केंद्र २०२१ मध्ये भारतात सुरू करणार असल्याची घोषणा कंपनीचे सीईओ टिम कूक यांनी केली. ते समभागधारकांना (शेअरहोल्डर) वार्षिक बैठकीत बोलत होते.
जगातील सर्वात मोठे स्मार्टफोनचे मार्केट असलेले असलेले किरकोळ विक्री केंद्र पुढील वर्षी सुरू करणार असल्याचे टीम कुक यांनी सांगितले. ते म्हणाले, की माझा ब्रँड दुसऱ्या कोणी तरी चालवावा, असे मला वाटत नाही. आम्हाला किरकोळ विक्रीत चांगले भागीदार व्हायचे नाही. आम्हाला आमच्या पद्धतीने काम करायला आवडते, असेही ते म्हणाले.
हेही वाचा-चिनी स्मार्टफोन कंपनी वापरणार इस्रोचे 'हे' तंत्रज्ञान
सध्या, भारतात अॅपलचे किरकोळ विक्री केंद्र हे तृतीय पक्षाकडून चालविण्यात येतात. अॅपलने मुंबईमध्ये जागा भाड्याने घेतल्याचे वृत्त आहे. मात्र, कंपनीने त्याला अद्याप दुजोरा दिलेला नाही. चालू वर्षाच्या तिसऱ्या तिमाहीत कंपनी ऑनलाईन स्टोअर चालू करण्याची शक्यता आहे. केंद्र सरकारने सिंगल ब्रँड रिटेलचे नियम शिथील केले आहेत. यावर अॅपल कंपनीने गेल्यावर्षी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि त्यांच्या टीमचे आभार मानले होते.
हेही वाचा-निर्यात बंदी उठवल्याने कांद्याच्या भावात सुधारणा; शेतकऱ्यांकडून निर्णयाचे स्वागत