अहमदाबाद - सर्वसामान्यांच्या खिशाला महागाईमुळे पुन्हा एकदा कात्री लागणार आहे. अमूलचे दूध १ जुलैपासून प्रति लिटर २ रुपयांनी महागणार आहे.
अमूल ब्रँडची मालकी असलेल्या गुजरात कोऑपरेटिव्ह मिल्क मार्केटिंग फेडरेशनने (जीसीएमएमएफ) दुधाच्या किमती १ जुलैपासून वाढविण्यात येणार असल्याचे बुधवारी जाहीर केले आहे. ही दरवाढ अमूलच्या सर्व प्रकारच्या दुधावर लागू होणार आहे. ही दरवाढ १ वर्ष आणि सात महिन्यानंतर करण्यात येत असल्याचे जीसीएमएमएफने म्हटले आहे. उत्पादन खर्च वाढल्याने दुधाची दरवाढ करण्याची गरज निर्माण झाल्याचे कंपनीने म्हटले आहे.
हेही वाचा-कोरोनाने मृत्यू झालेल्या व्यक्तींच्या कुटुंबियांना मदत करण्याचे केंद्राला 'सर्वोच्च' निर्देश
जीसीएमएमएफचे व्यवस्थापकीय संचालक आर. एस. सोधी म्हणाले, की अमूल दुधाच्या किमती संपूर्ण देशात उद्यापासून (१ जुलै) प्रति लिटर २ रुपयांनी वाढणार आहेत. हे नवीन दर अमूल ब्रँड असलेले गोल्ड, ताजा, शक्ती, टी-स्पेशल तसेच गाय व म्हैशीच्या दुधावर लागू होणार आहे.
हेही वाचा-ऐकावं ते नवलंच! गुजरातच्या पोलीस ठाण्यात 2 भूतांविरोधात गुन्हा दाखल
या कारणाने दुधाचे वाढविले दर-
पॅकेजिंगच्या दरात ३० ते ४० टक्क्यांनी वाढली आहे. तर वाहतुकीच्या खर्चात ३० टक्क्यांनी वाढली आहे. उर्जेच्या खर्चात ३० टक्क्यांनी वाढली आहे. त्यामुळे उत्पादन खर्चात वाढ झाल्याचे आर. एस. लोधी यांनी सांगितले.
अमूलचा संपूर्ण व्यवसाय दुधावर अवलंबून आहे. अमूलकडून रोज एकवेळ (पूर्वी दोन वेळ) ३६ लाख शेतकऱ्यांकडून दूध खरेदी करण्यात येते. कोरोनाच्या काळात लहान विक्रेते, लहान दूध डेअरी व्यवसायिक व मिठाई विक्रेते यांनी गुजरात व गुजरातबाहेर दूध खरेदी करणे थांबविले होते. त्यामुळे शेतकरी अमूलमध्ये जास्तीत जास्त दूध विक्रीला देत होते.
हेही वाचा-जम्मू काश्मीर - सुरक्षा दलाच्या कारवाईत दोन दहशतवाद्यांचा खात्मा
अमूलच्या जाहिरातीमुळे निर्माण झाला होता वाद
अमूलने सोया दुधाच्या जाहिरातीमध्ये वनस्पतीपासून तयार आलेली दुग्ध उत्पादने ही सोयाची पेये आहेत, दूध नसल्याचे म्हटले होते. हे दावे चुकीचे आहेत, असा ब्युटी विदाऊट क्रुएयल्टी, पेटा आणि शरण इंडिया या संस्थांनी आक्षेप घेतला होता. त्यावर अमूलने सर्व वैज्ञानिक माहिती पुरावे आणि संशोधन हे एएससीआयकडे सादर केले. अमूलच्या जाहिराती विरोधातील तक्रारी चुकीच्या आणि तथ्यहीन असल्याचे अमूलने म्हटले आहे. अमूलने केलेल्या दाव्यासाठी पुरेशी वैज्ञानिक आकडेवारी आहे. त्यानुसार दूध हे कॅल्शिय, कार्बोहायड्रेट्स, स्निग्धपदार्थ, क्षार आणि प्रथिनांचे चांगले स्त्रोत आहेत. अमूलच्या जाहिरातीविरोधात आक्षेप घेणाऱ्या तिन्ही याचिकाही एएससीआयने फेटाळल्या आहेत.