नवी दिल्ली - सलग दुसऱ्या वर्षी अक्षयतृतीयेला लॉकडाऊन असल्याने रत्ने आणि दागिने उद्योगाला मोठा आर्थिक फटका बसला आहे. कोरोनापूर्वी अक्षयतृतीयेला होणाऱ्या उलाढालीच्या तुलनेत केवळ १० टक्के उलाढाल यंदा अक्षयतृतीयेला १४ मे रोजी झाली आहे.
दरवर्षी अक्षयतृतीयेला २५ ते ३० टन सोन्याची विक्री होत असते. मात्र, यंदा केवळ जास्तीत जास्त ३ ते ४ टन सोन्याची विक्री झाली आहे. कल्याण ज्वेलर्ससारख्या संघटित सुवर्ण उद्योगांनी ऑनलाईन बुकिंगची ग्राहकांना दिली आहे. या ग्राहकांना नंतर प्रत्यक्षात सोन्याची डिलिव्हरी दिली जाणार आहे.
हेही वाचा-केंद्राच्या लसीकरण धोरणावर राहुल गांधींनी ओढले ताशेरे
देशभरातील ९० टक्के राज्यांमध्ये लॉकडाऊन
ऑल इंडिया जेम्स आणि ज्वेलरी डोमेस्टिक काउन्सिलचे (जीजेसी) चेअरमन आशिष पेठे म्हणाले, की गतवर्षीच्या तुलनेत कोरोनाची दुसरी लाट अत्यंत वाईट ठरली आहे. अनेकांनी आयुष्य गमाविले आहे. त्यामुळे ग्राहकांमध्ये नकारात्मकतेची भावना आहे. देशभरातील ९० टक्के राज्यांमध्ये लॉकडाऊन आहे. त्यामुळे रिटेल ज्वेलरी स्टोअर बंद राहिले आहेत. बिगर जीवनावश्यक असल्याने सोन्याचे दागिने डिलेव्हरी करण्याची परवानगी नाही.
हेही वाचा-खोदकामात सापडले चक्क १ एकर तळे, दलदलीत दडलेले ऐतिहासिक बांधकाम समोर
ग्राहकांमध्ये नकारात्मकतेचे वातावरण-
इंडिया बुलियन अँड ज्वेलर्स असोसिएशनचे (आयबीजेए) संचालक आणि पीएनजीचे चेअरमन सौरभ गाडगीळ म्हणाले, की अक्षयतृतीयेला सकाळी डिजीटल बुकिंग झाली आहे. तरीही ग्राहकांमध्ये कोरोनाच्या दुसऱ्या लाटेमुळे आणि तरलक्षमता कमी असल्याने नकारात्मकतेचे वातावरण आहे.