मुंबई - दिवाळीत लक्ष्मी पूजनाच्या दिवशी शेअर बाजारातील बीएसइ आणि नॅशनल स्टॉक एक्सचेंजमध्ये मुहूर्त ट्रेडिंग केले जाते. यावेळी पूजेचे आयोजनही केले जोते. यंदा ही ट्रेडिंग पूजा आज (27 ऑक्टोबर) आयोजित करण्यात आली आहे. अभिनेत्री मौनी रॉयच्या हस्ते ही पूजा करण्यात आली आहे. यावेळी अभिनेता राजकुमार रावदेखील उपस्थित होता.
संध्याकाळी लक्ष्मी पूजनच्या मुहूर्तावर शेअर्स आणि कमोडिटी बाजार खुले राहणार आहेत. मुहूर्त ट्रेडिंग (Live Trading Session Time) आज संध्याकाळी 6 वाजून 15 मिनिटांपासून ते 7 वाजपासून 15 मिनिटांपर्यंत खुले राहिल. दरवर्षी दिवाळीच्या मुहूर्तावर ट्रेडिंगसाठी विशेष सत्र आयोजित केले जाते. लक्ष्मी पूजनाच्या दिवशी आर्थिक भरभराटीसाठी ही पूजा करून शेअर बाजारातील व्यवहार सुरू ठेवले जातात.
हेही वाचा - ऐन दिवाळीत गुडविन ज्वेलर्स दुकानाला टाळे; गुंतवणूक करणारे लाखो ग्राहक चिंतेत
यंदा दिवाळीमध्ये उदयाचा दिवस हा बलिप्रतिपदा म्हणजेच दिवाळी पाडव्याचा दिवस आहे. उद्या सोमवार असल्याने कमोडीटी बाजार सकाळच्या सत्रामध्ये बंद राहतील. मात्र संध्याकाळी बाजार पुन्हा खुले होणार आहेत. लक्ष्मी पूजनाच्या दिवशी गुजराती समाजाचे नवे वर्ष सुरू होते. त्यामुळे व्यापारी वर्गामध्ये लक्ष्मी पूजनाच्या दिवसाचे विशेष महत्त्व असते.