ETV Bharat / business

वेगाने वाढणाऱ्या बाजारपेठांतील देशापैकी भारतामधील तरुणाई सर्वात अधिक निष्क्रिय - आयएमएफ - आंतरराष्ट्रीय नाणेनिधी

लिंगभेद, तांत्रिक बदल आणि नोकऱ्यांचा कनिष्ठ दर्जा ही कामगार मनुष्यबळासमोरील मोठी आव्हाने असल्याचे ब्ल्यूडॉर्न यांनी सांगितले.

रोजगार
author img

By

Published : May 7, 2019, 1:54 AM IST

नवी दिल्ली - लोकसभा निवडणुका पार पडत असताना सरकारची चिंता वाढविणारे मत आंतरराष्ट्रीय नाणेनिधीच्या अर्थतज्ज्ञांनी व्यक्त केले आहे. भारतामधील तरुणाई सर्वात अधिक निष्क्रिय ( बेरोजगारीचा अथवा शिक्षणाचा अभाव असल्याने सक्रियतेचा अभाव) असल्याचे आंतरराष्ट्रीय नाणेनिधीचे वरिष्ठ अर्थतज्ज्ञ जॉन ब्ल्यूडॉर्न यांनी म्हटले आहे. ते कामगार मनुष्यबळाच्या बाजारपेठ याविषयावर राजधानीत बोलत होते.

वेगाने विकसित होणाऱ्या बाजारपेठेपैकी भारतामधील तरुणाईंची निष्क्रियता सर्वात अधिक म्हणजे ३० टक्के असल्याचे ब्ल्यूडॉर्न यांनी म्हटले आहे. लिंगभेद, तांत्रिक बदल आणि नोकऱ्यांचा कनिष्ठ दर्जा ही कामगार मनुष्यबळासमोरील मोठी आव्हाने असल्याचे ब्ल्यूडॉर्न यांनी सांगितले. वेगाने वाढणाऱ्या आणि विकसित होणाऱ्या अर्थव्यवस्थांना विकसित देशांहून तांत्रिक बदल आणि स्वयंचलित (ऑटोमेशन) यांचा कमी धोका असतो, असे त्यांनी मत व्यक्त केले.

देशातील बेरोजगारी ही फेब्रुवारीमध्ये ७.२ टक्क्यापर्यंत वाढल्याचे मुंबईमधील सीएमआयई या संस्थेच्या आकडेवारीनुसार दिसून आले होते. राष्ट्रीय नमुना सर्वेक्षण कार्यालयाच्या (एनएसएसओ) आकडेवारीनुसार देशातील बेरोजगारी २०१७ मध्ये ६.१ टक्के होती. हा बेरोजगारीचा गेल्या ४५ वर्षातील सर्वात अधिक उच्चांक असल्याचेही एनएसएसओने म्हटले होते.

Intro:Body:

state 001

Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.