नवी दिल्ली - केंद्रीय सांख्यिकी मंत्रालयाप्रमाणे जागतिक बँकेनेही चालू वर्षात देशाचा ५ टक्के विकासदर राहिल, असा अंदाज व्यक्त केला. मात्र, पुढील आर्थिक वर्षात विकासदर ५.८ टक्के राहिल, असेही जागतिक बँकेने अंदाज व्यक्त केला.
बिगर बँकिंग वित्तीय कंपन्यांकडून होणारा वित्तपुरवठा अधिक काळापर्यंत कमी राहिल, असे जागतिक बँकेने अहवालात म्हटले आहे. जागतिक अर्थव्यवस्थेचा विकासदर हा २०२० मध्ये २.५ टक्के राहिल, असा जागतिक बँकेने अंदाज केला आहे. गतवर्षी गुंतवणूक आणि व्यापारात घसरण झाली असताना त्यात अंशत: सुधारणा होत आहे. मात्र, जोखीम कायम राहणार असल्याचे जागतिक बँकेने म्हटले.
हेही वाचा-शेअर बाजारात ६३५ अंशाची तेजी ; निफ्टीने पार केला १२,२०० चा टप्पा
वेगाने विकसित होणाऱ्या आणि विकसनशील अर्थव्यवस्थेचा विकासदर हा कमी राहिला आहे. धोरणकर्त्यांनी संरचनात्मक सुधारणा करण्याची संधी घेतली पाहिजे. त्यामधून व्यापक प्रमाणात वृद्धीदराला चालना मिळेल, असेही बँकेने अहवालात म्हटले आहे. हे गरिबीचे प्रमाण कमी करण्यासाठी अत्यंत महत्त्वाचे असल्याचे जागतिक बँकेचे उपाध्यक्ष (समन्यायी विकास, वित्त आणि संस्था) सेला पॅझरबॅसीओग्लू यांनी म्हटले आहे.
बिगर बँकिंग क्षेत्रातील कडक निर्बंध हे देशातील मागणी अंशत: कमी होण्यासाठी कारणीभूत ठरल्या जागतिक बँकेने अहवालात म्हटले आहे.
हेही वाचा-केंद्रीय अर्थसंकल्प २०२०-२१ : पंतप्रधान मोदी अर्थतज्ज्ञांची नीती आयोगात घेणार भेट