ETV Bharat / business

'सीमा शुल्क हे व्यापार सुविधा करण्यावर लक्ष केंद्रित करण्यात येणार' - केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन न्यूज

भारताच्या विकासासाठी आणि सीमा शुल्क विभागासाठी सुरक्षित पुरवठा साखळी महत्त्वाची आहे. त्यासाठी भारतीय सीमा शुल्क विभागाकडून आघाडीवर काम करण्यात येत आहे.

केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन
केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन
author img

By

Published : Jan 27, 2021, 5:35 PM IST

नवी दिल्ली - सरकारकडून भारतीय सीमा शुल्क हे उद्योगानुकूलता आणि व्यापार सुविधा केंद्र करण्याकडे लक्ष केंद्रित करण्यात येणार आहे. ही माहिती केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी दिली.

आंतरराष्ट्रीय सीमा शुल्क दिन २६ जानेवारीला जगभरात साजरा करण्यात येतो. त्यानिमित्त बोलताना केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन म्हणाल्या की, सीमा शुल्क अधिकारी हे लोकांवर लक्ष केंद्रित करत आहेत. तसेच विभागातील कामकाजात महत्त्वाचे बदल घडत आहेत. जागतिक सीमाशुल्क संस्थेने यंदा 'सीमा शुल्काची वसूली, नुतनीकरण आणि पुरवठा साखळी बळकट आणि शाश्वत करणे' ही संकल्पना निश्चित केली आहे. भारताच्या विकासासाठी आणि सीमा शुल्क विभागासाठी सुरक्षित पुरवठा साखळी महत्त्वाची आहे. त्यासाठी भारतीय सीमा शुल्क विभागाकडून आघाडीवर काम करण्यात येत आहे.

हेही वाचा-शेअर बाजारात दिवसाखेर ९३८ अंशांची पडझड; निफ्टी १४,०००हून खाली

केंद्रीय राज्य अर्थमंत्री अनुराग ठाकूर म्हणाले की, महामारीमधून आपण बाहेर येत आहोत. अशा स्थितीत सीमेवर हितसंरक्षण करण्यात सीमा शुल्क विभागावर महत्त्वाची जबाबदारी आहे.

हेही वाचा-ब्रँडेड पेट्रोलचे दर भडकले! राजस्थानात ओलांडला १०० रुपयांचा टप्पा...

दरम्यान, ई-कॉमर्स कंपन्यांना आयात-निर्यातीसाठी सीमा शुल्क विभागाच्या किचकट प्रक्रियेतून जावे लागते. ही प्रक्रिया सोपी करण्यासाठी सीमा शुल्क विभागात महत्त्वाचे बदल करण्यात येणार असल्याचे सूत्राने सांगितले.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.