ETV Bharat / business

कोरोनाच्या संकटात भडका! घाऊक बाजारपेठेत मे महिन्यात १२.९४ टक्के महागाई - wholesale price index

चालू वर्षात मे महिन्यात घाऊक बाजारपेठेत १२.९४ टक्के महागाईची नोंद झाली आहे. तर गतवर्षी मे महिन्यात घाऊक बाजारपेठेत उणे ३.३७ टक्के महागाईची नोंद होती.

Wholesale inflation
घाऊक बाजारपेठ महागाई
author img

By

Published : Jun 14, 2021, 3:46 PM IST

नवी दिल्ली - कोरोना महामारीच्या संकटातून जात असताना मे महिन्यात घाऊक बाजारपेठेतील महागाईचा नवा उच्चांक झाला आहे. मे महिन्यात १२.९४ टक्के या उच्चांकी महागाईची नोंद झाली आहे. कच्च्या तेलाचे वाढलेले दर आणि उत्पादित वस्तुंच्या वाढलेल्या किमतीने महागाईत भर पडली आहे.

चालू वर्षात मे महिन्यात घाऊक बाजारपेठेत १२.९४ टक्के महागाईची नोंद झाली आहे. तर गतवर्षी मे महिन्यात घाऊक बाजारपेठेत उणे ३.३७ टक्के महागाईची नोंद होती. सलग पाचव्या महिन्यात घाऊक बाजारपेठेत महागाई वाढली आहे. एप्रिल २०२१ मध्ये घाऊक बाजारपेठेत १०.४९ टक्के महागाईची नोंद झाली आहे.

हेही वाचा-जीएसटी परिषद : कोरोनाची 'ही' औषधे व उपकरणे होणार स्वस्त; लशीचे दर कायम

असे राहिले महागाईचे प्रमाण-

  • घाऊक बाजारपेठेतील महागाई निर्देशांकाप्रमाणे (डब्ल्यूपीआय) वार्षिक महागाईचा दर हा मे २०२१ मध्ये १२.९४ टक्के होता. तर मे २०२१ वार्षिक महागाईचा दर हा उणे ३.३७ टक्के राहिला आहे.
  • कच्च्या तेलाचे वाढलेले दर, पेट्रोल-डिझेल, नाफ्ताला, फर्नेस ऑईल आणि उत्पादित वस्तुंचे दर वाढल्याने ही महागाई वाढल्याचे केंद्रीय वाणिज्य आणि उद्योग मंत्रालयाने म्हटले आहे.
  • इंधन आणि उर्जाच्या वर्गवारीत मे महिन्यात महागाईचे प्रमाण ३७.६१ टक्के राहिले आहे. तर या वर्गवारीत एप्रिलमध्ये महागाईचे प्रमाण १०.८३ टक्के राहिले आहे.
  • कांद्याच्या किमतीत वाढ होऊनही मे महिन्यात अन्नाच्या वर्गवारीत घसरण झाली आहे. मे महिन्यात अन्नामधील महागाईचे प्रमाण ४.३१ टक्के राहिले आहे. मे महिन्यात कांद्याच्या महागाईचे प्रमाण २३.२४ टक्के राहिले आहे. तर एप्रिल महिन्यात कांद्याचे महागाईचे प्रमाण हे उणे १९.७२ टक्के होते.

हेही वाचा-स्टेट बँकेकडून कोरोना रुग्णांकरिता 'कवच वैयक्तिक कर्ज योजना'

दरम्यान, मागील महिन्यात भारतीय रिझर्व्ह बँकेने रेपो दर स्थिर ठेवले होते. आरबीआयने चालू वर्षात महागाईचा दर हा मार्च २०२२ अखेर ५.१ टक्के राहिल, असा आरबीआयने अंदाज केला.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.