नवी दिल्ली - केंद्रीय मंत्रीमंडळाच्या संसदीय कामकाज समितीने अर्थसंकल्पीय अधिवेशन दोन टप्प्यात घेण्याची शिफारस केली आहे. केंद्रीय अर्थसंकल्प १ फेब्रुवारीला सादर करावा, अशी संसदीय समितीने शिफारस केल्याचे सूत्राने सांगितले.
पहिल्या टप्प्यात ३१ जानेवारी ते ३ एप्रिलदरम्यान अर्थसंकल्पीय अधिवेशन घेण्याची केंद्रीय मंत्रीमंडळाच्या संसदीय कामकाज समितीने शिफारस केली आहे. तर दुसऱ्या टप्प्यात १ फेब्रुवारीला अर्थसंकल्प सादर करावा, असे समितीने म्हटले आहे. १ फेब्रुवारीला अर्थसंकल्प सादर करण्यात आल्यास हा २०१५-१६ नंतर पहिल्यांदाच शनिवारी सादर होणारा अर्थसंकल्प असणार आहे.
हेही वाचा-मलेशियाकडून पामतेल आयात थांबवा; सरकारची उद्योगांना सूचना
अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी लोकसभा आणि राज्यसभा एकत्रित बोलाविण्यात येणार आहे. राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या अभिभाषणाने अर्थसंकल्पीय अधिवेशनाची सुरुवात होणार आहे. याच दिवशी आर्थिक सर्वेक्षण संसदेत मांडला जाणार असल्याचे सूत्राने सांगितले. हे अधिवेशन एप्रिलपर्यंत चालेल, असेही सूत्राने सांगितले.
हेही वाचा-सोने प्रति तोळा ४८५ रुपयाने महाग; कमकुवत रुपयाचा परिणाम