नवी दिल्ली - 'केंद्रीय अर्थसंकल्प २०२०' ची छपाई प्रक्रिया सुरू करण्यापूर्वी आज पंरपरेनुसार हलवा समारंभाचे आयोजन करण्यात आले. नॉर्थ ब्लॉकमधील समारंभात केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी वित्तीय अधिकाऱ्यांना हलव्याचे वाटप केले. त्यानंतर अर्थसंकल्प छपाईसाठी रवाना करण्यात येणार आहे.
केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांच्या हस्ते हलवा समारंभाची वित्तीय मंत्रालयाच्या नॉर्थ ब्लॉकमध्ये सुरुवात करण्यात आली. यावेळी पंरपरेनुसार मोठ्या कढईत हलवा तयार करण्यात आला. सीतारामन यांनी केंद्रीय राज्य अर्थमंत्री अनुराग ठाकूर यांच्यासह वित्त मंत्रालयातील अधिकाऱ्यांना हलव्याचे वाटप केले. केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन या १ फेब्रुवारीला केंद्रीय अर्थसंकल्प सादर करणार आहेत.
हेही वाचा-जागतिक आर्थिक मंचात केंद्रीय वाणिज्य मंत्री भारतीय प्रतिनिधींचे करणार नेतृत्व
-
The Union Finance Minister, Smt. @nsitharaman presided over #HalwaCeremony today at North Block to mark the beginning of printing of #Budget2020 documents. MoS Shri @ianuragthakur was also present besides senior @FinMinIndia officials. pic.twitter.com/CgzYwYnLKx
— Ministry of Finance (@FinMinIndia) January 20, 2020 " class="align-text-top noRightClick twitterSection" data="
">The Union Finance Minister, Smt. @nsitharaman presided over #HalwaCeremony today at North Block to mark the beginning of printing of #Budget2020 documents. MoS Shri @ianuragthakur was also present besides senior @FinMinIndia officials. pic.twitter.com/CgzYwYnLKx
— Ministry of Finance (@FinMinIndia) January 20, 2020The Union Finance Minister, Smt. @nsitharaman presided over #HalwaCeremony today at North Block to mark the beginning of printing of #Budget2020 documents. MoS Shri @ianuragthakur was also present besides senior @FinMinIndia officials. pic.twitter.com/CgzYwYnLKx
— Ministry of Finance (@FinMinIndia) January 20, 2020
जाणून घ्या काय आहे, हलवा समारंभ-
हलवा समारंभानंतर अर्थसंकल्पाशी निगडीत असलेले वित्तीय मंत्रालयातील अधिकारी हे एकांतवासात राहतात. अर्थसंकल्प सादर करेपर्यंत त्यांना कुटुंबाबरोबर संपर्क ठेवण्यासही परवानगी नसते. या कालावधीत त्यांना जवळच्या व्यक्तींशी फोन अथवा मोबाईल तसेच ई-मेलने संपर्क ठेवता येत नाही. केवळ अतिवरिष्ठ अधिकाऱ्यांना घरी जाण्याची परवानगी असते. यामागे अर्थसंकल्प गोपनीय ठेवणे हा उद्देश असतो.
अशी आहे देशाची अर्थव्यवस्था-
- गेल्या सहा वर्षात देशाच्या राष्ट्रीय सकल उत्पन्नाचा (जीडीपी) विकासदर हा सर्वाधिक घसरला आहे.
- मंदावलेल्या अर्थव्यवस्थेमुळे वाहन उद्योग, स्थावर मालमत्ता क्षेत्रासह रोजगार निर्मितीला फटका बसला आहे.
- मागणी आणि गुंतवणूकीचा कमी झालेला ओघ पाहता देशाची वित्तीय उद्दिष्टे हुकण्याची शक्यता आहे.
- सरकारने महसुलातील तूट भरून काढण्यासाठी निर्गुंतवणुकीतून प्रयत्न केले आहेत.
- चालू वर्षात देशाचा जीडीपी ५ टक्के राहील, असा अंदाज आहे.
अर्थसंकल्प २०२०-२१ मध्ये रोजगार आणि मागणी वाढविण्यावर लक्ष केंद्रित केले जाण्याची शक्यता आहे. वैयक्तिक प्राप्तिकरात कपात होतील, अशी व्यापक स्तरावर अपेक्षा व्यक्त केली जात आहे.
हेही वाचा-पेट्रोल-डिझेलच्या दरात सलग पाचव्या दिवशी कपात; जाणून घ्या आजचे दर