ETV Bharat / business

चलनी नोटा छापण्याची वेळ आली - उदय कोटक यांचा केंद्राला सल्ला

author img

By

Published : May 27, 2021, 3:46 PM IST

सीआयआयचे अध्यक्ष उदय कोटक यांनी एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत म्हटले, की आरबीआयने केंद्र सरकारच्या प्रयत्नाला मदत केली आहे. माझ्या मते सरकारचा ताळेबंद विस्तारण्याची वेळ आहे.

उदय कोटक
उदय कोटक

बिझनेस डेस्क, ईटीव्ही भारत - कोरोना महामारीमुळे टाळेबंदी लागू असताना अर्थव्यवस्थेवर मोठा परिणाम झाला आहे. अशा स्थितीत भारतीय व्यापारी महासंघाचे (सीआयआय) अध्यक्ष उदय कोटक यांनी केंद्र सरकारला चलनी नोटा छापण्याचा सल्ला दिला आहे.

सीआयआयचे अध्यक्ष उदय कोटक यांनी एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत म्हटले, की आरबीआयने केंद्र सरकारच्या प्रयत्नाला मदत केली आहे. माझ्या मते सरकारचा ताळेबंद विस्तारण्याची वेळ आहे. आरबीआयच्या मदतीने चलनीकरणाचा विस्तार किंवा चलनी नोटांची छपाई करणे गरजेचे आहे. काहीतरी करण्याची वेळ आली आहे. जर आता नाही, तर कधी, असा प्रश्नही कोटक यांनी विचारला आहे.

हेही वाचा-'गोपनीयतेचा अधिकार मुलभूत हक्क, पण राष्ट्रीय सुरक्षेचीही सरकारवर जबाबदारी'

कोरोना महामारीत आर्थिक पॅकेज जाहीर करण्याची मागणी

दुसऱ्या एका मुलाखतीत कोटक यांनी कोरोना महामारीत आर्थिक पॅकेज जाहीर करण्याची मागणी केली आहे. समाजात कमी उत्पन्न असलेल्या लघू व्यवसायांना कर्जहमी देऊन ३ लाख ते ५ लाखांचे कर्ज देण्यावर सरकारने विचार करावा. सरकारने थेट पैसे हस्तांतरित करावेत अन्न किंवा इतर माध्यमांमधून मदत करावी, असेही कोटक यांनी म्हटले. ईसीएलजीएस योजनेत एसएमई उद्योगांना दुसरे पॅकेज असू शकते. हे पॅकेज गतवर्षी देण्यात आले होते.

हेही वाचा-नवीन डिजीटल कायदा; अंमलबजावणीचा अहवाल द्या, केंद्राचे सोशल मीडिया कंपन्यांना आदेश

गतवर्षी ३० लाख कोटींचे आर्थिक पॅकेज जाहीर-

केंद्र सरकारने २०२० मध्ये अर्थव्यवस्थेला चालना देण्याकरिता २७.१ लाख कोटी रुपयांचे आत्मनिर्भर पॅकेज जाहीर केले होते. हे पॅकेज जीडीपीच्या १३ टक्के होते. कोरोना महामारीचा होणारा परिणाम टाळण्याकरिता केंद्र सरकार आणि आरबीआयने एकूण ३० लाख कोटींचे पॅकेज जाहीर केले होते. हे पॅकेज जीडीपीच्या एकूण १५ टक्के आहे

हेही वाचा-'नव्या सोशल मीडियाच्या नियमाबाबत व्हॉट्सअपच्या वापरकर्त्यांनी घाबरण्यासारखे काही नाही'

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.